रांची : भारताचा पहिला टी-२० सामना काही वेळातच सुरु होणार आहे. पण न्यूझीलंडविरुद्धच्या या पहिल्या टी-२० सामन्यात भारताच्या कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.सलामीवीरया सामन्यात भारतापुढे सलामीसाठी पृथ्वी शॉ, शुभमन गिल आणि इशान किशन असे तीन पर्याय भारतीय संघापुढे आहेत. पण या सामन्यात इशान आणि गिल यांना समावेश करण्यात येईल. कारण गिल हा सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात आहे. दुसरीकडे इशानला संघात स्थान दिले तर तो सलामीबरोबर यष्टीरक्षणाचीही जबाबदारी पार पाडतो. त्यामुळे इशान आणि गिल यांना पहिल्या सामन्यासाठी संघात स्थान मिळेल. त्यामुळे पृथ्वीला आता संघात स्थान मिळण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.मधली फळीभारताच्या मधल्या फळीत यावेळी सूर्यकुमार यादव, कर्णधार हार्दिक पंड्या, दीपक हुडा आणि राहुल त्रिपाठी यांचा समावेश होऊ शकतो. सूर्या हा सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे. कर्णधार हार्दिकही उपयुक्त फलंदाजी करतो. राहुल त्रिपाठी हा तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे समोर आले आहे. जर एखादा सलामीवीर लवकर बाद झाला तर राहुल हा त्याची जागा घेऊ शकतो. त्याचबरोबर मधल्या फळीत दीपक हुडासारखा धडाकेबाज फलंदाजही आहे.गोलंदाजीभारतीय संघ या सामन्यात तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांसह उतरणार असल्याचे समोर येत आहे. या सामन्यात अर्शदीप सिंग, शिवम मावी आणि उमरान मलिक यांना संधी मिळू शकते. फिरकी गोलंदाजीमध्ये यावेळी वॉशिंग्टन सुंदरचे स्थान जवळपास निश्चित समजले जात आहे. सुंदर हा फिरकी गोलंदाजी करतो आणि तो दमदार फलंदाजीही करू शकतो. त्याचबरोबर सुंदर हा कोणत्याही स्थानावर फलंदाजीला येऊ शकतो. त्यामुळे संघासाठी तो महत्वाचा असेल. या सामन्यासाठी दुसरा फिरकीपटू कोण असेल, याची उत्सुकता सर्वांना असेल. कारण यावेळी ही स्पर्धा कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्यामध्ये असणार आहे. पण कुलदीप हा गेल्या काही सामन्यांपासून चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे या सामन्यासाठी कुलदीपला संधी मिळू शकते आणि चहलला संघाबाहेर ठेवले जाऊ शकते, असे संकेत आता मिळत आहेत.भारतीय संघ: शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव/युजवेंद्र चहल.