रोहतक: हरयाणाच्या रोहतकमध्ये एका कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. पतीनं पत्नी आणि मुलांना संपवलं. त्याची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. माझी पत्नी खूप चांगली होती. कमतरता माझ्यातच होती. ती मला नशिबानं मिळाली. मात्र मीच तिच्या योग्यतेचा नव्हतो. आयुष्याला कंटाळलो असल्यानं आत्महत्या करत आहे. मीच माझ्या कुटुंबाला संपवलं आहे आणि त्यात इतर कोणाचीच चूक नाही, असं पतीनं नोटमध्ये नमूद केलं आहे.

जिंद बायपास येथील बरसी कॉलनीमधील एका घरात कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडले. बुधवारी त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं. ३५ वर्षीय विनोद यांनी त्यांची पत्नी सोनिया, मुलगा अंश आणि मुलगी युविकाची हत्या केली. युविका सात, तर अंश पाच वर्षांचा होता. पेशानं डॉक्टर असलेले विनोद व्यावसायिक कारणांमुळे तणावाखाली होते, असं त्यांचे वडील राजेंद्र यांनी सांगितलं. ‘काम व्यवस्थित सुरू नसल्यानं ३-४ महिन्यांपासून विनोद तणावाखाली होता. अनेकदा फोनवर त्यानं याबद्दल सांगितलं होतं,’ अशी माहिती राजेंद्र यांनी दिली.
कुस्ती रंगली, पैलवानानं डाव टाकला; प्रतिस्पर्धी उठलाच नाही, कुटुंबाला वेगळाच संशय
राजेंद्र यांनी मंगळवारी विनोद यांना फोन केला. त्यामुळे राजेंद्र यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाला विनोद यांच्या घरी पाठवलं. विनोद यांनी आधी दोन्ही मुलांचा आणि पत्नीचा गळा कापला. त्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासातून उघडकीस आली. तिघांच्या हत्येसाठी स्वयंपाकघरात वापरला जाणारा चाकू वापरण्यात आला. पोलिसांनी हा चाकू घरातून ताब्यात घेतला आहे.
घरातून निघाले, रेल्वे स्टेशन गाठले, प्लॅटफॉर्मवर घुटमळले; अखेर दोघांचं ठरलं अन् सगळंच संपलं
मंगळवारी संध्याकाळी घरात डॉक्टर, त्यांची पत्नी आणि मुलांचे मृतदेह घरात सापडले. डॉक्टरांनी पत्नी आणि मुलगा, मुलीची गळा कापून हत्या केली. त्यानंतर आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना विनोद यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली. बऱ्याच दिवसांपासून ताणतणावाखाली होतो. त्यामुळे कुटुंबाला संपवून आत्महत्या करत आहे, असा उल्लेख त्यात होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here