जयपूर: राजस्थानमध्ये गेल्या १५ दिवसांपासून सत्तासंघर्ष सुरू आहे. बंडखोर नेते सचिन पायलट यांची काँग्रेसने हकालपट्टी केली. पण आता सचिन पायलट यांच्या गटाने सोमवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना हादरवले आहे. गहलोत गटातील १० ते १५ आमदार सचिन पायलट यांच्या संपर्कात आहेत, असा दावा काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आमदार हेमाराम चौधरी यांनी केलाय. या दाव्यामुळे बहुमताचा दावा करणारे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा गट हादराला आहे.

सचिन पायलट यांच्यासोबत असलेले तीन बंडखोर आमदार परण्यास इच्छुक असल्यातं काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यापूर्वी सांगितलं होतं. सुरजेवाला यांच्या या वक्तव्यानंतर पायलट गटाने एक व्हिडिओ जारी केलाय. सचिन पायलट यांच्या गटात असलेले ज्येष्ठ नेते हेमाराम चौधरी हे या व्हिडिओत दिसून येत आहेत. अशोक गहलोत याच्या गटातील १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. घेराबंदीतून मुक्त झाल्यानंतर लवकरच तुमच्याकडे येऊ असं ते आमदार सांगत आहेत. गहलोत यांनी आमदारांवरील बंधनं हटवली तर त्यांच्या बाजूने किती आमदार आहेत हे स्पष्ट होईल, असं हेमाराम चौधरी म्हणाले.

दुसरीकडे, राजस्थान सरकारवरील राजकीय संकट सोमवारी अधिक गहरे झाल्याचं चित्र होतं. राजभवनच्या प्रश्नांना शनिवारी रात्री उत्तर म्हणून गेहलोत सरकारने विधानसभेचे अधिवेशन बोलण्यासाठी पाठवलेला सुधारित प्रस्तावावरही राज्यपालांनी कुठलीच हमी दिली नाही. याउलट राज्यपाल कलराज मिश्र यांनी आणखी एक पत्र सरकारला पाठवले. तीन मुद्द्यांवर सहमती दर्शवल्यानंतरच सरकारला अधिवेशन बोलावता येईल, असं राज्यपालांनी या पत्रात कायदेशीर सल्ल्यानंतर स्पष्ट केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here