जानेवारीत काही नागरिकांनी चांदीच्या विटा दान केल्या. ते दान सामान्य समजलं गेलं. पण आता अनेक देणगीदार चांदी आणि सोन्याची साहित्य दान करण्यासाठी येत आहेत. पण याचे मूल्यांकन करणे ट्रस्टसाठी कठीण आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आतापर्यंत १ क्विंटलहून अधिक बहुमूल्य विटा
देणगीदारांकडून देण्यात येणाऱ्य सोन्या, चांदीच्या ठेवण्यासाठी बँकेत कोणतेही लॉकर नाहीत. यामुळे सर्व देणगीदारांना देणगी ऑनलाइन किंवा रोख रक्कम ट्रस्टच्या खात्यात जमा करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला आतापर्यंत १ क्विंटलपेक्षा अधिक चांदी व इतर धातूंच्या विटा दान करण्यात आल्या आहेत, असं ते म्हणाले.
PM मोदी ५ ऑगस्टला अयोध्येत
राम मंदिरांच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्टला अयोध्येत येणार आहेत. पंतप्रधानांचे वेळापत्रक निश्चित केले गेले आहे. सकाळी साडेअकरा वाजता ते अयोध्येत पोहोचतील आणि नागरिकांना संबोधितही करतील. अयोध्येत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी साकेत विद्यापीठातून रामजन्मभूमीकडे रवाना होतील. यावेळी पंतप्रधान मोदी हनुमानगढीलाही भेट देतील. भूमिपूजन कार्यक्रमात जवळपास २०० पाहुणे सहभागी होतील, असं सांगण्यात येतंय. विशेष पाहुण्यांसह साधु-संत आणि अधिकारीही या कार्यक्रमात सहभागी होतील, अशी माहिती आहे.
फक्त ३२ सेकंदात पायाभरणी
पंतप्रधान मोदी अयोध्येत राम मंदिरच्या प्रवासा दरम्यान भाषणही देतील. त्यांचा कार्यक्रम दोन तासांचा असेल. भूमिपूजनाची वेळ दुपारी १२.१५ मिनिटं आणि ३२ सेकंदाची आहे. यावेळी पंतप्रधान मोदी हे श्रीराम मंदिराचा शिलान्यासही करतील.
टाइम कॅप्सूल २०० फूट खाली ठेवला जाइल
रामजन्मभूमीचा इतिहास सिद्ध करण्यासाठी न्यायालयात दीर्घकाळ लढाई लढावी लागली. यामुळे आता राम मंदिर बांधताना ‘टाइम कॅप्सूल’ बनवून ते २०० फूट खोलवर ठेवले जाईल. भविष्यात जेव्हा कोणाला इतिहास पहायचा असेल तेव्हा रामजन्मभूमीच्या संघर्षाच्या इतिहासासह तथ्यही समोर येतील. यामुळे येथे कोणताही वाद उद्भवू शकणार नाही, असं रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य रामेश्वर चौपाल म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times