नवी दिल्ली : दररोज प्रमाणे आज सकाळी ६ वाजता सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले, त्यानंतर आणखी एक शनिवार वाहनचालकांची दिलासादायक ठरला आहे. सलग २५१ व्या दिवशीही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आजही देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये उपलब्ध असून तिथे प्रति लिटर पेट्रोलसाठी वाहनचालकांना ८४.१० रुपये तर डिझेलसाठी ७९.७४ रुपये खर्च करावे लागतील. दुसरीकडे, आणि सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आहे.क्रूडचे दर घसरलेजगातील पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात चढ-उताराचे सत्र सुरु असून आज क्रूडच्या किमती घसरताना दिसत आहेत. ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल ८७ डॉलरवरून प्रति बॅरल ८६.६६ डॉलरवर खाली व्यवहार करत आहेत. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल ८० डॉलरच्या खाली असून प्रति बॅरल ७९.६८ च्या पातळीवर दिसत आहे.मुंबईसह महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दरमुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरदिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटरकोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरचेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटरराज्यातील शहरातील इंधनाचे दरनागपूर : पेट्रोल १०६.०४ रुपये प्रति लिटर, डिझेल ९२.५९ रुपये प्रति लिटरपुणे : पेट्रोल १०५.८४ रुपये प्रति लिटर, डिझेल ९२.३६ रुपये प्रति लिटरकोल्हापूर : पेट्रोल १०६.४७ रुपये प्रति लिटर, डिझेल ९३.०१ रुपये प्रति लिटरऔरंगाबाद : पेट्रोल १०८ रुपये, डिझेल ९५.९६ रुपये प्रति लिटरपरभणी : १०९.४५ रुपये प्रति लिटर, डिझेल ९५.८१ रुपये प्रति लिटरनाशिक : पेट्रोल १०६.७७ रुपये प्रति लिटर, डिझेल ९३.२७ रुपये प्रति लिटर
Home Maharashtra Petrol Rate Today: कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा घसरल्या! पेट्रोल-डिझेलचे आजचे भाव काय