औरंगाबाद : शहरातील कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराने आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वत:ही विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन्ही मुलांवर औरंगाबदमध्ये उपचार सुरू आहेत. भागवत पंजाजी काळे (वय-३४) असं विष पिऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भागवत काळे हे शहरातील एका कंपनीत काम करतात. बाहेर फिरायला जातो, असं सांगून ते घरातून निघाले. मात्र नंतर ते दोन्ही मुलांना घेऊन अंबड रस्त्यावर आले आणि तिथे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना विष पाजलं. भक्ती आणि वेद अशी उपचार सुरू असलेल्या जुळ्या चिमुकल्यांची नावे आहेत.

भाकर रक्ताळली! पोटाची खळगी भरण्यासाठी निघालेल्या मजुरांची बस चंद्रपुरात पलटली, दोन ठार, १७ जण गंभीर जखमी

जन्मदात्या बापानेच आपल्या मुलांना विष पाजून स्वत: आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र भागवत काळे यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, या प्रकरणी औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here