ठाणे: जिल्ह्यातील बाधितांची संख्या ८० हजारापर्यंत पोहचली असून सोमवारी १४७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर जवळपास ५४ हजार २१२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २३ हजार ६४० रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत २१८९ रुग्ण दगावले आहेत. ( )

वाचा:

ठाणे शहरातील रुग्णसंख्या १८ हजाराच्या आसपास पोहचली असून ५९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मध्ये रुग्णसंख्येने १८ हजाराचा टप्पा ओलांडला असून ३१६ रुग्ण दगावले आहेत. नवी मुंबईमधील करोना रुग्णांचा आकडा जवळपास १४ हजाराच्या घरात गेला आहे. तर ३९४ रुग्णांचा मृत्यू झाला असून मिरा-भाईंदर मध्ये आतापर्यंत एकूण ७६८२ रुग्ण आढळले आहेत. मृतांचा आकडा २५६ इतका आहे. ६५३८ (११६ मृत्यू), भिवंडी ३५०५ (१९०), ३५८८ (१४०), बदलापूर २३६० (४१), ठाणे ग्रामीण ५६५३ (१३७) असे रुग्णांची व मृतांची संख्या आहे.

वाचा:

आज ५०३ रुग्ण झाले करोनामुक्त

ठाणे शहरामध्ये सोमवारी २२६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या १७ हजार ९५८ झाली आहे. शहरात सलग चौथ्या दिवशी पाचशेहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले. सोमवारी ५०३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्या एकूण रुग्णांची संख्या १२ हजार ८७ (६९टक्के) इतकी झाली आहे. सध्या शहरात करोनाचे ५ हजार २९० करोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. दिवसभरात ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ५८० पर्यंत पोहचली आहे.

वाचा:

दरम्यान, राज्यात आज तब्बल ८७०६ रुग्णांना करोनावर मात केली असून तुलनेत दिवसभरात दाखल झालेल्या नवीन रुग्णांचा आकडा कमी म्हणजे ७९२४ इतका आहे. हे आकडे करोना आटोक्यात आणण्याच्या दिशेने महाराष्ट्राचा प्रवास सुरू झाल्याचे संकेत देणारे ठरले आहेत. राज्यात आतापर्यंत १९ लाख २५ हजार ३९९ जणांची करोना चाचणी घेण्यात आली असून त्यातील ३ लाख ८३ हजार ७२३ जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे प्रमाण १९.९२ टक्के इतके आहे. राज्यात आतापर्यंत २ लाख २१ हजार ९४४ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here