प्रजासत्ताक दिनी एका शाळकरी विद्यार्थ्यानं दिलेल्या एका भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. आपल्याला लोकशाहीचा कसा फायदा होतो, याचं सुंदर वर्णन चिमुकल्यानं त्याच्या भाषणात केलं आहे. त्याचं भाषण ऐकून उपस्थितांना हसू आवरलं नाही. सव्वा मिनिटांचं भाषण ऐकून सगळ्यांनीच टाळ्यांचा कडकडाट केला.

‘खरं तर आज लोकशाही दिन आहे. या दिवसापासून देशात लोकशाही सुरु झाली. मला लोकशाही खूप आवडते. या लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करू शकता. भांडू शकता, दोस्ती करू शकता, प्रेमाने राहू शकता. पण मला तर मोक्कार धिंगाणा करायला, खोड्या करायला, रानात फिरायला, माकडासारखे झाडावर चढायला खूप आवडते. असं केल्यामुळे माझे बाबा मला मारत नाहीत. कारण ते लोकशाही मानतात. पण माझ्या गावातले बारकाले पोरं माझं नाव सरांना सांगतात. लोकशाहीची मूल्ये आतंकवादी जसे पायदळी तुडवतात तसं सर मला कधी कधी पायदळी तुडवतात. कधी कधी कोंबडा बनवतात आणि म्हणतात तुझं वागणं लोकशाहीला धरुन नाही. तुझ्या तक्रारी फार येतात. पण खरं सांगतो माझ्यासारखा गरीब पोरगा तालुक्यात शोधून सापडणार नाही. एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो. जय लोकशाही,’ असं चिमुकल्यानं त्याच्या भाषणात म्हटलं आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.