म. टा. प्रतिनिधी, सांगलीः सांगली जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात सहा करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बळींची संख्या ५७ एवढी झाली. दरम्यान, दिवसभरात नव्या १२१ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १७६२ एवढी झाली. यातील ८८३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, सध्या ८२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता सांगलीत करोना बळींची संख्या वाढत आहे. सोमवारी दिवसभरात सहा रुग्ण दगावले. यात मिरज येथील ५३ वर्षे पुरुष आणि ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. सांगली शहरातील ८७ वर्षीय महिला, तसेच पद्माळे येथील ५६ वर्षीय पुरुष, बेडग (ता. मिरज) येथील ४७ वर्षीय पुरुष आणि जत येथील ७२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. महापालिकेतील एका सफाई कर्मचा-याचाही करोना संसर्गामुळे मृत्यू झाला. रविवारी रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाल्यानंतर सोमवारी सकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here