वाशिम: सोयाबीन उत्पादक शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करत असताना दरात दिवसागणिक तेजीने घट होत आहे. त्यामुळे सोयाबीन साठवून ठेवलेले शेतकरी चिंतेत आहेत. मागील सात दिवसात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यावर्षी जगभरात सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत सोयाबीनला चांगले दर मिळत आहेत. मात्र याउलट भारतात सोयाबीनच्या दरात सातत्याने घट होत आहे. ही घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे सरकारने महागाई नियंत्रित ठेवण्याच्या नावाखाली सोयाबीनच्या वायद्यांवर असलेली बंदी एक वर्षाने वाढवली आहे. सरकारने हा निर्णय पोल्ट्री असोसिएशन व खाद्यतेल उत्पादकांच्या दबावापोटी घेतल्याचा शेतकरी संघटनांचा आरोप आहे. मागील काही दिवसांच्या दराचा विचार केला असता वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात घसरण सुरु होती. २१ जानेवारी रोजी ४६५० ते ५६७५२३ जानेवारी रोजी ४७५० ते ५६७६२४ जानेवारी रोजी ४७५० ते ५४४२२५ जानेवारी रोजी ४७०० ते ५४११२७ जानेवारी रोजी ४७५० ते ५२००२८ जानेवारी रोजी ४७५० ते ५२०१ रुपये दर मिळाले आहेत. २१ जानेवारी ते २८ जानेवारी ह्या अवघ्या सात दिवसात तब्बल ४७५ रुपयांची घसरण झाली आहे. याउलट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात झाली होती व दर ५८०० रुपयांच्या वर गेले होते. मात्र आता सातत्याने घट होत असल्याने सोयाबीन साठवून ठेवलेले शेतकरी चिंतेत आहेत.महिन्याभरात दर न वाढल्यास मोठा फटकासोयाबीनच्या दरात येत्या महिन्याभरात दरवाढ न झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. त्याचे कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांना मार्च एंडिंग च्या आधी पीक कर्जाची परतफेड करायची असते. त्यावेळी दर कमी असले तरी पीक कर्ज थकीत राहू नये म्हणून शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात सोयाबीन विकावे लागणार आहे. विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी किमान सत्तर टक्के सोयाबीनचा साठा घरात करून ठेवला आहे. उत्पादन खर्च बघता सोयाबीनला किमान साडेसहा ते सात हजार दर अपेक्षित आहे. मात्र सध्याच्या दरामुळे शेतकऱ्यांची निराशा होत आहे.सरकारी धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर गेल्यावर्षी सोयाबीनचे दर ११ हजारांपर्यंत जाऊन पोहोचले होते. शेतकऱ्यांनी दर वाढल्यानं सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. मात्र, केंद्र सरकारच्या वायदेबंदीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. वायदेबंदी डिसेंबर २०२३ पर्यंत कायम राहणार असल्यानं सोयाबीनच्या दरात वाढ होईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here