कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने आपल्या सख्ख्या बहिणीची हत्या केली आहे. यामुळे जिल्हा हादरला असून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या पोलिसांकडून महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. हत्येनंतर आरोपी तरुण रक्ताने माखलेला कोयता हातात घेऊन रस्त्यावर फिरत होता. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ घाट येथे एक तरुण दारूच्या नशेत रक्ताने माखलेला कोयता हातात घेऊन फिरत होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच तरुणाला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या सख्ख्या बहिणीचा खून केला असल्याचे सांगितले. दारूच्या नशेत तरुणाने बहिणीचा खून केला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याशिवाय एका पोत्यावर गीता प्रताप असे रक्ताने लिहिलेले असून हत्या झालेल्या महिलेचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. मृतदेह शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. आजच्या दिवसातील ही कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी हत्येची घटना आहे. या घटनांमुळे कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here