चित्रकूट: लग्न घटिका समीप आली असताना नवरदेव सतत नवरीच्या खोलीत जात होता. सतत वधू पक्षाच्या खोलीत जाणं नवरदेवाला चांगलंच महागात पडलं. नवरदेवाच्या वडिलांनी त्याच्या कानशिलात ठेऊन दिली. त्यानंतर नवरदेवानंही वडिलांवर हात उचलला. हा प्रकार नवरी संतापली आणि तिनं लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे नवरदेवाला वरात माघारी न्यावी लागली.

उत्तर प्रदेशच्या चित्रकटू जिल्ह्यात शिवरामपूरमधील एका गावात विवाह सोहळा सुरू होता. कानपूरच्या बर्रा येथील तरुणासोबत गावातील तरुणीचा विवाह ठरला होता. गावात वाजतगाजत वरात आली. जयमाला सोहळ्यादरम्यान नवरीचं सौंदर्य पाहून नवरदेव हरखला. विवाह झाल्यानंतर नवविवाहिता ४ ते ५ दिवसांमध्येच माहेरी जाते आणि त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर सासरी येते, अशी प्रथा मुलाकडे आहे. त्यामुळे मुलगा नाराज झाला. नवरीनं माहेरी जाऊ नये यासाठी तो सतत तिच्या खोलीत जाऊन तिची समजूत काढत होता.
लाँग ड्राईव्हसाठी निघाला डॉक्टर, मध्येच थांबला; ४० लाखांची मर्सिडीज पेटवली, कारण…
लग्नाचे विधी सुरू असताना नवरदेव सतत नवरीच्या खोलीत जात होता. हा प्रकार नवरदेवाच्या वडिलांना आवडला नाही. त्यांनी भर मंडपात मुलाच्या कानशिलात ठेऊन दिली. वडिलांनी सर्वांसमोर थोबाडीत मारल्यानं नवरदेव संतापला. रागाच्या भरात त्यानंही वडिलांच्या श्रीमुखात भडकावली. हा प्रकार पाहून नवरीनं विवाह रद्द करण्याचा निर्णय घेतला.

नवरदेव अनेकदा माझ्या खोलीत आला आणि वर्षभरापर्यंत तुला घरी जाऊ देणार नाही, असं सांगत होता असा दावा तरुणीनं केला. तुला वर्षभर माहेरी पाठवणार नाही. तुला शिक्षण पूर्ण करायचं असेल तर सासरी म्हणजेच कानपुरातच कर, चित्रकूटला जायचं नाही, असं नवरदेवानं सांगितलं. त्यावरून तरुणी आधीच त्रासली होती. त्यातच थोबाडीत मारल्यानं प्रकरण तापलं. यामुळे तिनं लग्नच रद्द केलं.
मला माहित्येय तुम्ही गरीब आहात! दुकानात शिरलेला ‘अतिथी’ चोर हलवायासाठी पत्र सोडून गेला अन्..
नवरीच्या निर्णयानंतर लग्नाचे विधी थांबवण्यात आले. त्यामुळे एकच गोंधळ झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी रजोल नागर यांनी दोन्ही पक्षांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही कुटुंब ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. आपापल्या वाट्याचा खर्च परत करण्याची तयारी दोन्ही बाजूंनी दर्शवली. त्यानंतर नवरदेवानं वरात माघारी नेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here