बँकॉक: थायलंडमध्ये एक अजब घटना घडली आहे. एका महिलेनं तिच्या पतीला मसाज पार्लरला एका तरुणीसोबत पकडलं. पत्नीला पार्लरमध्ये पाहताच पती फरार झाला. मात्र तरुणीला पत्नीनं धरलं आणि तिला नग्न करून मारहाण केली. ही घटना थायलंडच्या फुकेतमधील आहे. महिलेचा पती पाय मोकळे करण्याच्या बहाण्यानं घरातून बाहेर पडला होता.

घरातून निघाल्यानंतर पती एका मसाज पार्लरमध्ये गेला. पती बाहेर पडताच पत्नीदेखील घराबाहेर पडली. पती नेमका कुठे जातो, याबद्दल तिला शंका होती. त्यामुळे तिनं पतीचा पाठलाग सुरू केला. महिलेचा पती मसाज पार्लरला पोहोचला. तिथे गेल्यानंतर पाच मिनिटं उलटत नाहीत तोवर पत्नी तिथे दाखल झाली. त्यावेळी तिनं केवळ टॉवेलमध्ये असलेल्या तरुणीला पाहिलं. संतापलेल्या पत्नीनं तिचं टॉवेल खेचलं. यानंतर तिनं तरुणीच्या थोबाडीत मारल्या. जवळपास ५ मिनिटं पत्नी तरुणीला मारहाण करत होती. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आली लग्न घटी समीप नवरा, सतत मारी वधू कक्षाच्या चकरा; वडिलांनी सटकन मुस्काटात दिली अन्…
घटनेचा व्हिडीओ पाहून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. व्हिडीओमध्ये एक महिला एका तरुणीला मारताना दिसत आहे. झालेल्या प्रकारामुळे तरुणी घाबरली आहे. महिलेनं तिचा फोन खेचण्याचाही प्रकार केला. मसाज पार्लरमधील अन्य तरुणींसमोरच ही घटना घडली. तरुणीनं माफी मागण्याचा प्रयत्न केला. मसाज पार्लरमध्ये आलेला पुरुष विवाहित असल्याची कल्पना तरुणीला नव्हती, अशा शब्दांत इतर तरुणींनी महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला.
लाँग ड्राईव्हसाठी निघाला डॉक्टर, मध्येच थांबला; ४० लाखांची मर्सिडीज पेटवली, कारण…
घटना नेमकी कधी घडली याचा शोध घेत असल्याचं मुअनग फुकेत पोलीस स्टेशनचे कर्नल सारावुत चौरासित यांनी सांगितलं. ‘मसाज पार्लर कोणता आहे ते समजू शकलेलं नाही. आम्हाला अद्याप याबद्दल तक्रार मिळालेली नाही. पीडितेनं याबद्दल तक्रार नोंदवायला हवी,’ असं चौरासित म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here