कंपनीत आलेल्या एखाद्या उमेदवाराची मुलाखत घेत असतना मुलाखत घेणाऱ्याचीच नोकरी गेली तर? इतरांवर नोकऱ्या देणाऱ्याचीच नोकरी तो नोकरीसाठीची मुलाखत घेत असतानाच हिरावली गेली तर? जगप्रसिद्ध कंपनी गुगलच्या एचआरसोबत हा प्रकार घडला आहे. गेल्या काही दिवसांपासून बड्या बड्या कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरू आहे. ऍमेझॉन, गुगलसारख्या कंपन्यांनी शेकडो जणांना नारळ दिला आहे.

बिझनेस इनसाइडरच्या वृत्तानुसार, डॅन लॅनिगेन रायन नावाची व्यक्ती गुगलच्या डब्लिन कार्यालयात रिक्रूटर म्हणून कार्यरत आहे. रायन गुगलसाठी एका उमेदवाराची मुलाखत घेत होते. उमेदवाराची मुलाखत फोनवरून सुरू होती. कॉल सुरू असताना रायन यांनी कंपनीच्या इंटर्नल वेबसाईटवर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आलं. इंटर्नल वेबसाईट ओपनच होत नव्हती.
आली लग्न घटी समीप नवरा, सतत मारी वधू कक्षाच्या चकरा; वडिलांनी सटकन मुस्काटात दिली अन्…
रायन उमेदवाराची मुलाखत घेत असताना अचानक कॉल कट झाला. त्यानंतर रायन यांनी ई मेलवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला. तोही निष्फळ ठरला. कारण सेवा बंद झाली होती. मात्र रायन एकटे नव्हते. त्यांच्या टीममधील अनेकांना हीच अडचण येत होती. आपल्याला कामावरून काढण्यात आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र त्यांना गुगलकडून कोणताच अधिकृत मेल आला नव्हता. मॉर्गन किनलेच्या माध्यमातून रायन गुगलसाठी काम करत होते. रायन यांना काही वेळात मॉर्गन किनलेकडून मेल आला. तुम्हाला कार्यमुक्त करण्यात आलं असून ३ फेब्रुवारीपर्यंत नोटीस पेमेंट मिळेल. कामावरून काढलेल्यांना कंपनीच्या सर्व वस्तू परत कराव्या लागतील, असा उल्लेख मेलमध्ये होता.
लाँग ड्राईव्हसाठी निघाला डॉक्टर, मध्येच थांबला; ४० लाखांची मर्सिडीज पेटवली, कारण…
रायन यांचा गुगलसोबतचा करार सप्टेंबर २०२२ पर्यंत होता. मात्र गुगलनं हा करार वर्षभरासाठी वाढवला होता. यानंतर कंपनीनं रायन आणि त्यांच्या काही साथीदारांना मार्केटिंग स्टाफच्या हायरिंग टीममधून गुगल क्लाऊडच्या हायरिंग स्टाफमध्ये हलवलं. त्यामुळे आपली नोकरी कधीच जाणार नाही, अशी खात्री रायन यांना वाटत होती. मात्र प्रत्यक्षात वेगळंच घडलं आणि रायन यांची नोकरी गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here