कोल्हापूर: तालुक्यातील राक्षी येथील एकलव्य अलगीकरण कक्षात विनामास्क खेळणाऱ्या सहा बाधितांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ( )

वाचा:

एकलव्य कोविड केअर सेंटरचे समन्वय अधिकारी प्रविण राव यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. उमेश चौगुले (वय ३२ रा. पोर्ले), महादेव जयसिंग साळुंखे वय (२७ रा. पोर्ले), गुणाजी बबन पाटील (वय २१), संदीप नामदेव कळंत्रे (वय ३६), वैभव पांडुरंग पाटील (वय २१) व विजय पाटील (वय ३२ सर्व रा. कोतोली) या सहा जणांवर विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

वाचा:

संबंधित सहा जणांना करोना विषाणूची लागण झालेली आहे, हे माहीत असताना सुद्धा एकत्र येऊन तोंडास कोणत्याही प्रकारचे कापड अगर मास्क न लावता पोर्ले विरुद्ध कोतोली असे टीमला नाव देवून फूटबॉल सामना खेळला गेला. संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवले जाते. जिल्ह्यात करोनाच्या संदर्भात लागू असलेल्या विविध नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच जिल्ह्यात सायंकाळी ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत संचारबंदी चालू असताना संबंधितांनी फुटबॉल खेळ खेळल्याने त्यांच्यावर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात २४६ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ४ हजार ६२१ इतकी झाली आहे. दुसरीकडे करोनामृत्यूचे आकडेही चिंता वाढवणारे आहेत. सोमवारी आणखी ९ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा १३० झाला आहे.

वाचा:

सांगलीत सहा रुग्णांचा मृत्यू, नवे १२१ रुग्ण

सांगली जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात सहा करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बळींची संख्या ५७ एवढी झाली. दरम्यान, दिवसभरात नव्या १२१ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १७६२ एवढी झाली. यातील ८८३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, सध्या ८२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता सांगलीत करोना बळींची संख्या वाढत आहे. सोमवारी दिवसभरात सहा रुग्ण दगावले. यात मिरज येथील ५३ वर्षे पुरुष आणि ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. सांगली शहरातील ८७ वर्षीय महिला, तसेच पद्माळे येथील ५६ वर्षीय पुरुष, बेडग (ता. मिरज) येथील ४७ वर्षीय पुरुष आणि जत येथील ७२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. महापालिकेतील एका सफाई कर्मचाऱ्याचाही करोना संसर्गामुळे मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाल्यानंतर सोमवारी सकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here