: रत्नागिरीतील प्रख्यात वैद्य प्रमोद ऊर्फ रघुवीर पांडुरंग भिडे (वय ७३ वर्षे) यांचे सोमवारी पहाटे संसर्गाने निधन झाले. रुग्णांना बरे करण्यासाठी अखेरपर्यंत झटणारे ऋषितुल्य यांना करोना विरुद्धची लढाई मात्र दुर्दैवाने जिंकता आली नाही. त्यांच्या निधनाने रत्नागिरी शहरात शोककळा पसरली आहे. ( Dies )

वाचा:

रुग्णांना बरे करण्याचे घेतलेले व्रत वैद्य यांनी अखेरपर्यंत सोडले नाही. आवश्यकता असल्यास घरी जाऊन रुग्ण तपासण्याचे कार्य त्यांनी अगदी करोनाच्या काळातही सुरू ठेवले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना एक अपघात झाला होता आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांना ताप आल्याने करोनाची टेस्ट करण्यात आली. ती सुरुवातीला निगेटिव्ह आली; मात्र नंतर दोन दिवसांनी पुन्हा केलेली टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच त्यांचे निधन झाले. कोरोनावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर चर्मालय येथील स्मशानभूमीत रत्नागिरी नगरपालिकेच्यावतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. वैद्य भिडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, पुतण्या वैद्य मंदार भिडे असा परिवार आहे.

वाचा:

वैद्यचूडामणी रघुवीर वैद्य

प्रमोद ऊर्फ रघुवीर पांडुरंग भिडे यांनी बीएससी झाल्यानंतर आयुर्वेद क्षेत्रातील वैद्यचूडामणी ही त्यांच्या काळातील सर्वोच्च पदवी संपादन केली होती. रत्नागिरी पालिकेच्या माळ नाका येथील आयुर्वेदीक दवाखान्यात त्यांनी कित्येक वर्षे सेवा दिली. सेवानिवृत्तीनंतर ते आपल्या घरी आणि टिळक आळी येथील दवाखान्यात वैद्यकीय सेवा देत असत. अनेक असाध्य आजारांवर त्यांनी उपचार केल्यानंतर रुग्ण बरे होत असत. रत्नागिरी बरोबरच गोवा राज्यातही त्यांनी आयुर्वेदिक उपचार देत ख्याती मिळवली होती. , बालसुधारगृह अशा संस्थांमध्ये त्यांनी भरीव काम केले. स्वतः ब्रीजचे उत्तम खेळाडू असलेल्या वैद्य भिडे यांनी त्या खेळाच्या प्रसारासाठीही प्रयत्न केले. आयुर्वेदिक वैद्यक क्षेत्रात केलेले प्रयोग, संशोधन याबाबत त्यांनी सातत्याने वृत्तपत्रांमधून लेखन केले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here