थेतले यांची पत्नी सकाळी झोपेतून उठल्यावर तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही प्रतिसाद दिला नाही. थेतले यांना फोन केला, मात्र ते फोन उचलत नव्हते. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले.

 

death
सहायक पोलीस निरीक्षकाने राहत्या घरात गळफास घेतला
मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश थेतले (३८) यांनी चुनाभट्टी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली.

अशी आहे घटना


थेतले हे पत्नीसह चुनाभट्टी पोलीस वसाहतीतील समर्थ कृपा इमारतीत राहत होते. ते शनिवारी रात्री उशिरा कामावरून घरी आले. रात्री जेवणानंतर ते झोपण्यासाठी गेले. पत्नी झोपल्याचे पाहून त्यांनी खोलीच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली. त्यांनी पत्नीला आणि कुटुंबियांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मला माफ करा मेसेज केला. त्यानंतर त्यांनी घरातील छताला नॉयलॉनची दोरी लावून आत्महत्या केली. थेतले यांची पत्नी सकाळी झोपेतून उठल्यावर तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही प्रतिसाद दिला नाही. थेतले यांना फोन केला, मात्र ते फोन उचलत नव्हते. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. मात्र आतून कडी असल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी थेतले हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here