औरंगाबाद : मावस भावाला व्हिडिओ कॉल करून २९ वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील मुकुंदवाडी भागात शनिवारी घडला. अमोल उत्तम खाडे (वय-२९, रा.शाहूनगर, मुकुंदवाडी) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मात्र सदर तरुणाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अमोल हा रिक्षाचालक होता. रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. अमोलचे साडेतीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला अडीच वर्षांची एक मुलगी आहे. पत्नी गेल्या अनेक महिन्यांपासून माहेरी गेली असल्याने तो एकटाच भाड्याने घेतलेल्या घरात राहत होता.

शनिवारी संध्याकाळी अमोलने ज्योतीनगर भागात राहणाऱ्या मावस भावाला व्हिडिओ कॉल केला आणि आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्याला मावस भावाने समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र अमोल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. नातलगांनी तातडीने अमोल राहत असलेल्या घराकडे धाव घेतली. मात्र नातेवाईक पोहोचल्यानंतर त्यांना अमोल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

नायब तहसीलदार पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे वैफल्यग्रस्त, शिक्षिकेच्या मृत्यूचं गूढ उकललं

नातेवाईकांनी तातडीने अमोलला रुग्णालयात हलवले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून अमोल खाडे याला मृत घोषित केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, घरघुती वादातून अमोलने आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here