अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी मतदान सुरू झाले. मात्र या निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले डॉ. रणजीत पाटील हे अडचणीत सापडले असून त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजताच प्रचाराची मुदत संपलेली असतानाही आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने डॉ. रणजित पाटील यांच्या समर्थनार्थ रविवारी (दि. २९) महेश भवन येथे मेळावा आयोजित केला होता. त्यामुळे आचारसंहिता उल्लंघन प्रतिबंधक पथकाने (फिरते पथक) राजा पेठ पोलिसांत तक्रार दिली. त्या तक्रारीवरून भाजप उमेदवार रणजित पाटील यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी ११ वाजता भाषण सुरू होते. ही बाब पथकाच्या लक्षात आली. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीतच रणजीत पाटील हे अडचणीत आले आहेत.

मविआमध्ये ठिणगी, कसब्यात ठाकरेंच्या मावळ्याने शड्डू ठोकला, काँग्रेस काय करणार?

मतदारसंघ पिंजून काढला

चुरशीच्या होत असलेल्या या निवडणुकीत डॉ. रणजीत पाटील यांच्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी संपूर्ण विभाग पिंजून काढला आहे. महाविकास आघाडीकडून लिंगाडे यांच्यासाठी जोर लावला जात आहे. त्यांनी स्वत:ही १२ दिवसांत ५०० हून अधिक गावांना भेटी दिल्याचा दावा केला आहे. जुनी पेन्शन योजना ही निवडणूक प्रचारातील महत्त्वाची बाब राहिली.

जिल्हानिहाय मतदार

अमरावती : ६४ हजार ३४४

अकोला : ५० हजार ६०६

बुलढाणा : ३७ हजार ८९४

वाशीम : १८ हजार ०५०

यवतमाळ : ३५ हजार २७८

२६२ केंद्र राहणार

निवडणुकीसाठी विभागात २६२ मतदान केंद्र राहतील. अमरावती जिल्ह्यात ७५, अकोला ६१, बुलढाणा ५२, वाशीम २६ व यवतमाळ जिल्ह्यात ४८ केंद्रे असतील.

व्यवस्था अशी

– केंद्र अध्यक्ष : २८८

– मतदान अधिकारी : १ हजार १५३

– सूक्ष्म निरीक्षक : २८९

(विविध कक्ष व नोडल अधिकारीही नियुक्त)

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here