औरंगाबाद : अभ्यासाच्या तणावातून विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. बहीण घरात असेपर्यंत तो तिच्याशी हसून-खेळून बोलत होता. मात्र बहीण ट्यूशनला जाताच सदर तरुणाने टोकाचं पाऊल उचलले. वैभव नारायण खंडागळे (वय -२१, रा.मयूर नगर,औरंगाबाद ) असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वैभव हा एम. जी. एम महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्याचे वडील कंपनीत कामगार आहेत. रविवारी सुट्टी असल्याने त्याचे आई-वडील जळगाव जिल्ह्यात देवदर्शनासाठी गेले होते. घरी दोन्ही भाऊ-बहीणच होते. दुपारी बहीण ट्यूशनला गेल्यानंतर वैभवने घराच्या समोरील दरवाज्याला बाहेरून कुलूप लावले आणि मागील दरवाज्याने घरात जाऊन गळफास घेतला.

मित्राला घरी सोडायला कार घेऊन निघाले, पण वाटेतच घडला अपघात, दोन मित्र ठार

संध्याकाळी बहीण ट्यूशनवरून आल्यानंतर तिला घराला कुलूप दिसल्याने ती मावशीकडे गेली. मात्र रात्री १० वाजताच्या दरम्यान आई-वडील घरी आल्यानंतर त्यांनी स्वतःजवळील चावीने दरवाजा उघडला आता तेव्हा वैभवने गळफास घेतल्याचे आढळून आले. मुलाला लटकलेल्या अवस्थेत बघून आई-वडिलांच्या काळजाचं पाणी झाली. त्यांनी तातडीने वैभवला फासावरून खाली उतरवत रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, मागील सत्र परीक्षेत वैभव एका विषयात नापास झाला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता. अभ्यासाच्या ताणातूनच त्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गरड करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here