राजू आणि शिपू यांचा विवाह १२ वर्षांपूर्वी झाला. त्यांना तीन मुली आहेत. सर्वात मोठी लेक दिलखुश ११ वर्षांची आहे. ७ वर्षांची डिंपल आणि १ वर्षांची रीना यांच्यामुळे कुटुंब पंचकोनी झालं. तिघा बहिणींना आता भाऊ मिळाला. मात्र त्यांचे वडील आता या जगात नाहीत. दिलखुशनं वडिलांच्या प्रेताला मुखाग्नि दिला. राजू त्यांच्या वडिलांचा एकुलता एक लेक होता. चालक म्हणून काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. राजू यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजू यांच्या आईनं नातवाचं तोंड पाहिलं. मात्र त्याआधी त्यांनी त्यांचा मुलगा गमावला. राजू यांच्या निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
जोधपूरपासून ९० किलोमीटरवर मोठा अपघात झाला. त्यात हेड कॉन्स्टेबल तेजाराम (३५), कॉन्स्टेबल मोहनलाल यांचा मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी ते गुन्हेगाराला पकडण्यासाठी नागौरला जात होते. त्यांची कार राजूराम देवासी (३८) चालवत होते. आसोपहून दीड किलोमीटर पुढे गेल्यानंतर कारला समोरून येणाऱ्या ट्रेलरनं धडक दिली. त्यात तेजाराम, मोहनलाल आणि राजूराम यांचा मृत्यू झाला.
Home Maharashtra road accident, दुर्दैवी! इकडे बाळाचा जन्म, तिकडे वडिलांवर अंत्यसंस्कार; ११ वर्षांच्या लेकीनं...