नाशिक: शहरातील सातपूर भागात असलेल्या राधाकृष्ण नगर परिसरात वडील दीपक शिरोडे, मुलगा प्रसाद शिरोडे आणि राकेश शिरोडे या तिघांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना काल घडली होती. या तिघांच्या आत्महत्येनंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. आत्महत्यांच्या घटनेनंतर पोलिसांना तपासात घरात एक चिठ्ठी आढळून आली असून त्यामध्ये कर्जबाजारीपणा आणि सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दीपक शिरोडे अशोक नगर बस स्टॉप येथील भाजी बाजाराजवळ, तर प्रसाद आणि राकेश चार चाकी वाहनातून फळ विक्रीचा व्यवसाय करत होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते कर्जबाजारी झाले होते. रविवारी दुपारच्या सुमारास दीपक शिरोडे यांची पत्नी बाहेर कामानिमित्त गेल्याने घरात वडील आणि दोघा मुलांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. दीपक शिरोडे यांच्या पत्नी घरी आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. घरी परतल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला त्यांना आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
दुर्दैवी! इकडे बाळाचा जन्म, तिकडे वडिलांवर अंत्यसंस्कार; ११ वर्षांच्या लेकीनं दिला मुखाग्नी
दीपक शिरोडे यांच्या पत्नीने आसपासच्या नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडल. घरात प्रवेश केल्यावर पतीसह दोन्ही मुलांनी गळफास घेऊन लटकलेलं पाहून त्यांनी हंबरडा फोडला. घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलिसांना खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे चिठ्ठी मिळाली. मात्र चिठ्ठीत सावकाराचे नाव आहे की नाही याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.
अरेरे! आंघोळीला गेलेल्या नववधूचा करुण अंत; हातावरची मेहंदी जाण्याआधी मृत्यूनं गाठलं
सकाळी झाली मुलगी आणि दुपारी वडिलांची आत्महत्या
खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून वडील आणि दोन मुलांनी आत्महत्या केली. त्यातील मोठा मुलगा प्रदीप शिरोडे याला काल सकाळी मुलगी झाली त्यांची पत्नी मुंबईला माहेरी असून रविवारी सकाळी कन्येला जन्म दिला. परिवारात लक्ष्मीचे आगमन झाले अशी आनंदाची वार्ता शिरोडे कुटुंबीयांनी सर्वांना सांगितली होती. मात्र घरात आनंदाचे वातावरण असतानाच शिरोडे कुटुंबातील तिघांनी जीवन यात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here