लखनऊ: उत्तर प्रदेशच्या वाराणसीत साडे चार वर्षांच्या चिमुरड्याची हत्या झाली. त्याचा मृतदेह थर्माकॉलच्या बॉक्समध्ये सापडला. मुलगा शनिवारी रात्रीपासून बेपत्ता होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या चौकशीत हत्येचं कारण उघडकीस आलं आहे. हत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी चौकाघाट पोलीस चौकीला घेराव घालत कठोर कारवाईची मागणी केली. चिमुकल्याच्या निधनामुळे आई, वडिलांसह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

जैतपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोषीपुरा परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलं. त्यात आरोपी मुलाचा मृतदेह थर्माकॉलच्या बॉक्समधून नेत असताना दिसत होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला पकडलं. दोषीपुरात वास्तव्यास असलेल्या मोहम्मद जुनैद यांना दोन मुलं आहेत. त्यापैकी धाकटा मुलगा अबू इस्माईल शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. वेफर खरेदी करण्यासाठी घरातून निघालेला अबू पुन्हा परतला नाही. त्याचे कुटुंबीय रात्रभर त्याचा शोध घेत होते. जैतपुरा पोलीस ठाण्यात त्यांनी अबूच्या बेपत्ता असण्याची तक्रार दाखल केली.
दुर्दैवी! इकडे बाळाचा जन्म, तिकडे वडिलांवर अंत्यसंस्कार; ११ वर्षांच्या लेकीनं दिला मुखाग्नी
रविवारी सकाळी जैतपुरामध्ये असलेल्या विणकर बाजारातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोषीपुराचा रहिवासी असलेला शाहिद जमाल (२०) अबू इस्माईलला सोबत घेऊन जात असताना दिसला. फुटेज पाहून पोलिसांनी शाहिदला ताब्यात घेतलं. अबूची गळा दाबून हत्या केल्याचं त्यानं सांगितलं. अबूचा मृतदेह गोणीत भरून थर्माकॉलच्या बॉक्समध्ये टाकून काजीसादुल्लाहपुरा येथील एका बंद असलेल्या सिनेमागृहाजवळ असलेल्या गल्लीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी फेकल्याची माहिती त्यानं दिली. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

अबूच्या हत्येबद्दल समजताच कुटुंबावर शोककळा पसरली. संतापलेल्या कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी चौकाघाट पोलीस चौकीला घेराव घातला. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. आरोपीला न्यायालयाकडून कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करू, असं आश्वासन पोलिसांनी अबूच्या कुटुंबीयांना दिलं.
अरेरे! आंघोळीला गेलेल्या नववधूचा करुण अंत; हातावरची मेहंदी जाण्याआधी मृत्यूनं गाठलं
आरोपी शाहिदचं अबूच्या घरी येणं जाणं असायचं. तो अबूच्या कुटुंबाला ओळखायचा, अशी माहिती वाराणसीतील काशी झोनचे उपायुक्त असलेल्या आर. एस. गौतम यांनी सांगितलं. शाहिद अबूला किराणा दुकानात घेऊन गेला. तिथे त्यानं थर्माकॉलच्या एका बॉक्समध्ये बंद करून अबूला संपवलं. त्यानंतर सकाळी बॉक्स कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ टाकला. आरोपीचा काही दिवसांपूर्वी अबूच्या मोठ्या भावासोबत वाद झाला होता, अशी माहिती तपासातून उघडकीस आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here