भोपाळ: मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये वास्तव्यास असलेल्या एका व्यापाऱ्याचा आणि त्याच्या पत्नीचा मृतदेह घरात आढळला आहे. शनिवारी दुपारी दोघांचे मृतदेह घरात सापडले. व्यापाऱ्यानं आधी पत्नीवर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत:वर गोळी झाडल्याचं सांगितलं जात आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. मृतदेह सापडल्यानंतर जवळपास १२ तासांनी शनिवारी रात्री १२ वाजता व्यापाऱ्याच्या फेसबुक आयडीवरून सुसाईड नोट आणि व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत.

व्हिडीओमध्ये व्यापारी आणि त्याची पत्नी दिसत आहेत. दोघे रडत आहेत. व्यापारी संजय सेठ काही जणांची नावं घेऊन यांच्याकडून पैसे परत मिळणं अवघड असल्याचं म्हणत आहेत. फोटो, व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली. पन्ना पोलीस घटनेचा तपास करत आहे. संजय आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे.
थर्माकॉलच्या बॉक्समध्ये चिमुरड्याचा निष्प्राण देह; CCTVनं निष्पाप मुलाच्या मृत्यूचं गूढ उकललं
आता जगायची इच्छा नाही. मुलांसाठी तरी माझे पैसे परत करा, असं फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये संतोष सेठ बोलताना दिसत आहे. त्यांचा हिरे आणि कपड्याचा व्यापार होता. व्हायरल सुसाईट नोट आणि व्हिडीओमध्ये संजय यांनी डझनभर लोकांची नावं घेतली आहेत. काही जणांकडून पैसे मिळणं कठीण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काही जण पैसे परत करतील असा विश्वास संजय यांनी व्यक्त केला आहे. त्यांची नावांचा उल्लेखही त्यांनी केला आहे.
दुर्दैवी! इकडे बाळाचा जन्म, तिकडे वडिलांवर अंत्यसंस्कार; ११ वर्षांच्या लेकीनं दिला मुखाग्नी
संजय यांच्या घरी शनिवारी दुपारच्या सुमारास दूधवाला पोहोचला. त्यानं दार ठोठावलं. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. पण घरातून टीव्हीचा मोठा आवाज येत होता. त्यामुळे दूधवाल्याला विचित्र वाटलं. त्यामुळे तो संजयच्या मोठ्या भावाकडे गेला. त्यानंतर मोठा भाऊ संजय यांच्या घराबाहेर पोहोचला. त्यांनी दार ठोठावलं. मात्र दार उघडलं गेलं नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी दार तोडलं. त्यावेळी आतमध्ये संजय आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here