तिरुअनंतपुरम: केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील एका घरात बिबट्या मृतावस्थेत सापडला. कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या अडकला होता. जवळपास सहा तास बिबट्या खुराड्यात अडकून पडला. फिलिप नावाच्या व्यक्तीच्या घरात ही घटना घडली. कोंबड्यांचा आवाज ऐकून फिलिप उठले. त्यावेळी त्यांना खुराड्यात बिबट्या दिसला. त्यांनी याची माहिती पोलिसांना आणि वन विभागाला दिली. मात्र ते येण्याआधीच बिबट्यानं जीव सोडला.

खुराड्यात तब्बल सहा तास अडकल्यानं बिबट्याला धक्का बसला. मानसिक धक्क्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. बिबट्याचा उजवा पंजा लोखंडी खुराड्याच्या जाळीत अडकला होता. त्याच स्थितीत बिबट्या मृतावस्थेत आढळल्यानं वनाधिकाऱ्यांनी सांगितलं. लोखंडी जाळी कापून बिबट्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. बिबट्या गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्या तोंडाजवळही जखमा होत्या. पिंजऱ्याच्या लोखंडी जाळीला आदळल्यानं तो जखमी झाल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.
VIDEO: सलूनमध्ये निवांत काम सुरू, तितक्यात मोठा आवाज; काही सेकंदांत थेट घुसली भरधाव कार
बिबट्याच्या मृत्यूचं कारण शोधून काढण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आलं. खुराड्यात अनेक तास अडकल्यामुळे बिबट्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे तो मृत्यूमुखी पडल्याचं प्राण्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी मन्नारक्कडच्या जंगलाजवळच्या परिसरात एक बिबट्या पाहिला होता. आता मृत पावलेला बिबट्या तोच असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here