उस्मानाबाद: ऑक्सिजन सिलिंडर डोक्यात पडल्यामुळे नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबादच्या वाशी येथील श्री विठ्ठल खासगी रुग्णालयाबाहेर हा प्रकार घडला. अर्णव नलावडे असं मृत मुलाचं नाव आहे. दुर्घटनेनंतर अर्णवला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

श्री विठ्ठल रुग्णालयाच्या समोरच दुर्दैवी घटना घडली. अर्णव नलावडेच्या डोक्यावर अवजड ऑक्सिजन सिलिंडर पडला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. अर्णव रुग्णालयाच्या बाहेर खेळत होता. त्यावेळी त्या ठिकाणी ठेवलेले सिलिंडर अचानक कोसळले. पैकी एक सिलिंडर अर्णवच्या डोक्यावर पडला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
हृदयद्रावक! सकाळी घरात लक्ष्मी आली; दुपारी वडील, आजोबा अन् काकांनी जीवनयात्रा संपवली
रुग्णालयाच्या समोर ऑक्सिजनचे सिलिंडर अतिशय बेजबाबदारपणे ठेवण्यात आले होते, असा आरोप अर्णवच्या नातेवाईकांनी केला. रुग्णालयाच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. घटना घडल्यानंतर रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी जमली. काही वेळ तणावाचं वातावरण होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here