मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ४२ डॉलर ते ४४ डॉलरच्या दरम्यान स्थिर आहेत. त्यामुळे सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जैसे थेच ठेवल्या होत्या. आजसुद्धा कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही.

मुंबईत मंगळवारी पेट्रोलचा भाव ८७.१९ रुपये असून डिझेलचा भाव प्रती लिटर ८०.११ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल ८०.४३ रुपये असून डिझेलचा भाव ८१.९४ रुपयांच्या ऐतिहासिक स्तरावर आहे.कोलकात्यात पेट्रोल ८२.१० रुपये आहे. तर डिझेल ७७.०४ रुपये प्रती लीटर आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये असून डिझेल ७८.८६ रुपये आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली. मंगळवारी ब्रेंट क्रूडचा भाव ४३.७६ डॉलर प्रती बॅरल झाला आहे. त्यात किंचित वाढ झाली.

याआधी रविवारी पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेलमध्ये १५ पैशांनी वाढ केली होती. सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या दरात वाढ नोंदवली गेली. राजधानी दिल्लीत डिझेल प्रति लिटर ८१.९४ रुपयांवर, मुंबईत ते १४ पैशांनी वाढून ८०.१७ रुपये या किमतीवर पोहचले होते. या दरांमध्ये स्थानिक कर, मूल्यवर्धित कर यांची भर पडून डिझेल आणखी महागले.

जूनमध्ये उडाला होता इंधन दरवाढीचा भडका
देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. देशात इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दररोज सकाळी इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. यात झालेलं नसून भरून काढण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी मागील महिनाभर पेट्रोल आणि डिझेल दर वाढवले.
डिझेल दरवाढीने यापूर्वीच माल वाहतूकदारांचे कंबरडे मोडले असून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दरवाढीचे संकेत दिले आहेत. मच्छिमार बोटींसाठी डिझेलचा वापर केला जातो. त्याशिवाय शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर डिझेलवरच चालतात. डिझेलमध्ये होत असलेली दरवाढ या घटकांचा खर्च वाढवणारी आहे.

वाचा :

कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली. मंगळवारी ब्रेंट क्रूडचा भाव ३५ सेंट्सने वाढला आणि ४३.७६ डॉलर प्रती बॅरल झाला. करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने अमेरिकेच्या सिनेटने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आर्थिक पॅकेजला अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे कमॉडिटी बाजारात तेलाच्या किमती वाढत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here