वॉशिंग्टन : अचानक खजिना सापडून एखादा करोडपती झाल्याच्या अनेक घटना तुम्ही वाचल्या असतील. असाच एक प्रकार समोर आला आहे. यामध्ये या व्यक्तीसोबत असं काही घडलं की वाचून तुम्हालाही धक्का बसेल. या मजुराला भिंतीच्या मागे लपवलेली मोठी रोकड हाती लागली. भिंतीच्या मागे एवढा नोटांचा खजिना असेल याची त्याला कल्पनादेखील नव्हती. अचानक भिंत कोसळली आणि त्याला त्या पलीकडील नोटांचा ढिग दिसला.

ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षात दीड कोटी रुपयांची ही रक्कम भिंतीच्या मागे लपवण्यात आलेली होती. एका बॉक्समध्ये ही रक्कम सापडली. पण एवढा मोठा खजिना सापडल्यानंतरही या मजुराच्या हाती काहीच लागलं नाही. त्यामुळे मजुराने या रकमेला शाप लागल्याचे म्हटले आहे.

क्षणात पती आणि ३ मुलं पोरकी; भर रस्त्यात तरुणाने महिलेवर झाडली गोळी
डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणारा बॉक्स किड्स एका ठिकाणी काम करत होता आणि तिथे त्याच्यासमोर भिंत कोसळली. त्यामागे त्याला दीड कोटी रुपयांची रोकड सापडली. पण ज्या ठिकाणी रोकड सापडली ती मालमत्ता अमांडा रीस यांची असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमांडा रीस हिने बॉक्सला दहा टक्के रक्कम देण्याची ऑफर केली होती. पण बॉक्सने४० टक्के हिस्सा मागितला. यावरून दोघांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आणि अखेर यावर ड्युन इस्टेटने दावा मिळवला. त्यामुळे याच्यामध्ये हाती काहीच न लागल्याचं समोर आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here