मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवलीमध्ये एका जोडप्याचा बेडवरून वाद झाला. बेडवर कोणी झोपायचं यावरून सुरू झालेला वाद अखेर पोलीस ठाण्यात पोहोचला. पत्नीला थोबाडीत दिल्याप्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आबे. पतीनं कानशिलात दिल्यानं पत्नीच्या कानाला दुखापत झाली. हे दाम्पत्य बोरिवली पश्चिमेला असलेल्या रामबाग लेनमधील येथील एका सोसायटीत वास्तव्यास आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेनं एप्रिल २०२२ मध्ये पतीकडे घटस्फोट मागितला. मात्र त्यानं नकार दिला. यानंतर दोघांमध्ये सातत्यानं वाद सुरू झाले. घरात एकच बेड असल्यानं दोघांनी एक तोडगा काढला. एक दिवस पती बेडवर झोपणार, दुसऱ्या दिवशी पत्नी बेडवर झोपणार असं ठरलं. शनिवारी रात्री एकच्या सुमारास तक्रारदार महिला बेडवर झोपली होती. त्यावेळी तिच्या पतीनं बेडवर आराम करायचा असल्याचं म्हटलं. मात्र आज आपली पाळी असल्याचं तिनं सांगितलं.
मैत्री, विश्वास अन् दगा; महिलेला घोळात घेतले; व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले अन् मग…
यानंतर दोघांमध्ये वाद झाला. पतीनं पत्नीच्या थोबाडीत लगावली. त्यामुळे आपल्याला गंभीर दुखापत झाल्याचा दावा महिलेनं केला. तिनं तातडीनं तिच्या मैत्रिणीशी संपर्क साधला आणि मदत मागितली. यानंतर तक्रारदार महिला दवाखान्यात गेली. कानावर जोरात आघात झाल्यानं ऐकण्याची क्षमता बाधित झाल्याचं डॉक्टरांनी महिलेला सांगितलं. यानंतर महिला बोरिवली पोलीस ठाण्यात पोहोचली.
टीव्हीचा मोठा आवाज, दार आतून बंद; व्यापाऱ्यानं पत्नीसोबत जीव दिला; १२ तासांनंतर फेसबुकवर…
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३२५ च्या अंतर्गत एफआयआरची नोंद केली आहे. पत्नीला इजा पोहोचवल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. ‘आम्ही पतीविरोधात एफआयआर नोंदवला आहे. बेडवर झोपण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पतीनं पत्नीच्या श्रीमुखात भडकावली. त्यामुळे महिलेच्या कानाला दुखापत झाली,’ असं सहायक पोलीस निरीक्षक विशाल झगडे यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here