मुंबई: धावत्या रेल्वेसमोर उडी घेत चीफ लोको इन्स्पेक्टरनं आत्महत्या केल्याची घटना मुंबईत घडली आहे. भरधाव वेगानं येत असलेल्या लोकलसमोर झेपावत अधिकाऱ्यानं आयुष्य संपवलं. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यामध्ये चीफ लोको इन्स्पेक्टर लोकलची वाट पाहत असल्याचं स्पष्ट दिसत आहेत.

रेल्वेचा अधिकारी फलाटावर इतर प्रवाशांप्रमाणेच उभा असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं. समोरून लोकल येताना दिसताच अधिकारी धावत धावत फलाटावरून उतरला आणि थेट रुळांवर जाऊन झोपला. हा प्रकार आसपासच्या लोकांनी पाहिला. पुढच्या काही सेकंदांत लोकल अधिकाऱ्याला चिरडून गेली. ही घटना पाहून फलाटावर असलेल्या काही महिला किंचाळल्या.
पोलीस होऊनच गावी परत येईन! तरुणाचा निश्चय, मैदानी चाचणीत तिसरा; पण नियतीच्या खेळात हरला
या प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कामाच्या ताणामुळे चीफ लोको इन्स्पेक्टरनं आत्महत्या केली नसल्याचं पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here