मंगळुरू: आई ओरडल्यानं एका शाळकरी मुलानं आत्महत्या केली आहे. कर्नाटकमधील मंगळुरूत १४ वर्षीय विद्यार्थ्यानं आयुष्य संपवलं. मोबाईलवर वेळ वाया घालवत असल्यानं आई मुलाला ओरडली. त्यानंतर मुलगा आंघोळ करण्यासाठी जात असल्याचं सांगून त्याच्या खोलीत गेला. खोलीत त्यानं गळफास घेतला. काल संध्याकाळी ही घटना घडली.

ननेश त्याच्या आई वडिलांसोबत पडावुतील रेड ब्रिक्स अपार्टमेंटमध्ये राहतो. नववीत शिकणारा ननेशला त्याची आई (विनया) ओरडली. मोबाईलवर वेळ वाया घालवत असल्यानं आईला राग आला. त्यामुळे आई ननेशला ओरडली. त्यामुळे ननेश नाराज झाला. सतत फोन वापरत असल्यानं आई संतापली. तिनं ननेशला सुनावलं. यानंतर ननेश त्याच्या खोलीत गेला. आंघोळ करायला जात असल्याचं त्यानं आईला सांगितलं.
लेकीच्या लग्नाला यायचं हं! पत्रिका वाटायला निघाले बाबा, सोबत लेकालाही घेतलं; पण भलतंच घडलं
आंघोळीला जातो सांगून ननेश त्याच्या खोलीत गेला. तो बराच वेळ बाहेर आला नाही. त्यामुळे ननेशचे वडील जगदिश यांनी त्याच्या खोलीच्या खिडकीची काच फोडली आणि आत गेले. त्यावेळी त्यांना ननेश गळफास लावलेल्या स्थितीत लटकलेला दिसला. या प्रकरणी कनकानडी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here