बीड: शेतात असलेल्या विहिरीत विद्युत पंप सोडत असताना पाय घसरून पडल्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संदिप बारीकराव खाडे असे मृत मुलाचे नाव आहे. तो आष्टीतील देवळालीत वास्तव्यास होता.

बीडच्या आष्टी तालुक्यातील देवळाली येथील पांडुरंग भोजीबा खाडे हे त्यांचा पुतण्या संदिपला सोबत घेऊन शेतातील विहिरीत विद्युत पंप सोडण्यासाठी गेले होते. मात्र विहिरीला कठडा नसल्याने विद्युत पंप सोडताना संदिपचा पाय अचानक घसरला आणि तो तोल जाऊन विहिरीत पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडताच चुलत्याने आरडाओरड केली. पण पोहता येत नसल्याने संदिपचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.
पोलीस होऊनच गावी परत येईन! तरुणाचा निश्चय, मैदानी चाचणीत तिसरा; पण नियतीच्या खेळात हरला
संदीपला ना वडिलांचे प्रेम मिळालं, ना आईची माया मिळाली. वडील भोळसर असल्याने ते बाहेरच असतात. तर कौटुंबिक वादातुन आई घर सोडून निघून गेलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संदीपचा सांभाळ त्याची आजी करत होती. आई, वडिलांच्या मायेला पारखा झालेला संदिप आजीला रोजच्या कामांमध्ये मदत करायचा. म्हाताऱ्या आजीची तो काठी होता. मात्र संदीपच्या अकाली निधनानं आजीचा आधार हरपला आहे. त्यामुळे आजीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here