सिंधुदुर्ग : आंबोली घाटातील (Amboli Ghat) खोल दरीत युवक कोसळल्याचा बनाव अखेर उघड झाला असून हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावताना संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. आज पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर हा बनाव उघड झालाय. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आलेली व्यक्तीच दरीत कोसळल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झालंय. त्यामुळं दरीतील दोन मृत्यूंचं गूढ अखेर उघड झालं आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, आंबोली घाटातील खोल दरीत कोसळून युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरीत कोसळलेल्या युवकाचा शोध सुरू केला. त्यावेळी पोलिसांना दोन मृतदेह सापडले. त्यामुळे दुसरा मृतदेह कुणाचा याचा पोलिस शोध घेत असतानाच त्यांना मृत युवकाच्या मित्रावर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. यावेळी एकाची हत्या करून तो मृतदेह दरीत टाकण्यासाठी आलो असताना माझ्यासोबतच्या मित्राचा पाय घसरून तो दरीत कोसळला आणि त्याचा देखील मृत्यू झाला अशी माहिती मृत युवकाच्या मित्राने पोलिसांनी दिली. त्यामुळे दरीतील दोन मृतदेहांचं गूढ अखरे उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.  

कराडमधील वीट व्यवसायिकाला कामगार पुरवतो असे सांगून एकाने कराड येथील एकाकडून पैसे घेतले. परंतु संबंधित व्यक्तीने कामगार पुरवले नाहीत. शिवाय पैसे देखील परत दिले नसल्याने त्याला दोघांनी गाडीत घालून मारहाण केली. परंतु मारहाण केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा मृतदेह आंबोली दरीत टाकण्यासाठी सोमवारी रात्री आंबोली जवळील मुख्य धबधब्याजवळ हे दोघेजण आले. मृतदेह खोल दरीत फेकण्यासाठी दोघे ही कठड्यावर उभं राहिले. यावेळी यातील जण मृतदेहासोबत दरीत कोसळला आणि त्याचाही मृत्यू झाला. त्यांनतर सोबत असलेला एक जण तिथेच रात्रभर गाडीत बसून राहिला.

news reels reels

दुपारी पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याने पोलिसाना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आणखी काही माहिती मिळतेय का याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.   

महत्वाच्या बातम्या

माणूस की सैतान! भिवंडीत 39 वर्षाच्या नराधमाचे 7 वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here