नवी मुंबई: पनवेल शहरात दिवसेंदिवस मृत्यूच्या घटना घडत आहेत. अनेक वेळा व्यक्तींना अपघातामध्ये जीव गमवावा लागतो. तर काहींची प्रेम संबंधातून हत्या होते. तर काही जण स्वत:ला संपवतात. अशीच एक धक्कादायक घटना इंडियाबुल्स सोसायटीमध्ये घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून एका वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्या तरुणीने उडी मारून आत्महत्या केली की घातपात आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मृत तरुणीचे नाव मेरी निरीश आहे. ही तरुणी पनवेल शहरातील कोनगाव समोरील इंडिया बुल्समधील अस्टर इमारतीत आठव्या मजल्यावर राहत होती. घटना घडली त्यावेळी तरुणीच्या घरात तिचा एक मित्र आला होता.
बाळा दरवाजा उघड! खोली बाहेर आई, बाबा ओरडत होते; बंद दाराआड मुलासोबत घडलं भयंकर
मेरीचे शिक्षण सुरू होते. ती ऍमेटी युनिव्हर्सिटीमध्ये फॅशन डिझाइनिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. तर तिचा मित्र फोटोग्राफीचा कोर्स करत आहे. २९ जानेवारीला सकाळी अकराच्या सुमारास इमारतीच्या बाल्कनीमधून मेरी अचानक खाली पडली. इमारतीमध्ये असलेले सुरक्षारक्षक आणि नागरिकांना ही बाब लक्षात आली. त्यांनी तिला तात्काळ पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र मेरीच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लेकीच्या लग्नाला यायचं हं! पत्रिका वाटायला निघाले बाबा, सोबत लेकालाही घेतलं; पण भलतंच घडलं
इंडियाबुल्स सोसायटीमधील या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असून तपास सुरू केला आहे. मेरीने आठव्या मजल्यावरून स्वतःहून उडी मारून जीवन संपवले की तिला कुणी ढकलून दिले, तिने कोणत्या मानसिक त्रासाला कंटाळून हे कृत्य केले याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. इंडियाबुल्स सोसायटीमधील वीस वर्षीय तरुणीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here