सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आंबोलीत एक तरुण दरीत कोसळल्याचे समजताच जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ याची दखल घेण्यात आली. पण नंतर भलताच प्रकार उघडकीस आला. मारहाण करताना देणेकऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह आंबोलीतील दरीत टाकताना सदर व्यक्तीही पाय घसरुन दरीत कोसळल्याचे समोर आले आहे. तिसऱ्या व्यक्तीने हा प्रकार पाहिला. त्याने याबद्दलची माहिती दिली. कराड येथील वीट व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

दरीत कोसळलेला तरुण आंबोलीत पर्यटनासाठी आला नव्हता. तर तो एका मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आला होता हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वीट व्यावसायिकांच्या आर्थिक वादातून ही घटना घडली आहे. वीट व्यावसायिक भाऊसो माने याने एका व्यक्तीला सुमारे तीन लाख रुपये दिले होते. हे पैसे कर्जदाराला परत करता आले नाहीत. त्यामुळे माने यांनी कर्जदाराला मारहाण केली. मारहाणीवेळी त्या व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. संबंधित व्यक्तीला मारहाण करणाऱ्या व्यक्तींपैकी एका व्यक्तीने ही माहिती दिली.
लेकीच्या लग्नाला यायचं हं! पत्रिका वाटायला निघाले बाबा, सोबत लेकालाही घेतलं; पण भलतंच घडलं
मारहाणीत अचानक देणेकऱ्याचा जीव गेल्याने घाबरून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या दोघांनी आंबोली गाठली. अंधारात कुणाला दिसणार नाही म्हणून रात्रीच्यावेळी ते मृतदेह दरीत फेकायला आले. मात्र पैसे उधार दिलेली व्यक्तीही मृतदेहासोबत पाय घसरून खाली पडली. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या सर्व घटनेचा साक्षीदार असणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीने ही माहिती सिंधुदुर्ग पोलिसांना दिली. दरम्यान या प्रकाराची माहिती मिळाल्यापासून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
बाळा दरवाजा उघड! खोली बाहेर आई, बाबा ओरडत होते; बंद दाराआड मुलासोबत घडलं भयंकर
उपस्थित तिसऱ्या व्यक्तीने सांगितले सत्य
कर्जाची रक्कम अदा न केल्याने मारहाणीत कर्जदाराचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आंबोली येथे दरीत टाकण्यासाठी कराड येथील वीट व्यावसायिक भाऊसो माने हा एका मित्रासह आंबोलीत आला. मात्र मृतदेह टाकताना मानेही दरीत कोसळल्याने त्याच्यासोबत आलेला मित्र घाबरला. त्याने या घटनेची माहिती माने याच्या कुटुंबियांना दिली. तसेच सिंधुदुर्ग पोलिसांनाही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीअंती खरा प्रकार समोर आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here