श्रीनगर: काश्मीरमध्ये भारतविरोधी वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेला फुटीरतावादी नेता (syed ali shah geelani) याला पाकिस्तानने आपला सर्वोच्च नागरी सन्मान ” () देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी सिनेटने सोमवारी हा मोठा निर्णय घेतला. या व्यतिरिक्त गिलानी याच्या नावे एक विद्यापीठ उभारण्याचाही पाकिस्तानचा प्रस्ताव आहे. (pakistan to give nishaan e )

गिलानी यांनी पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार ‘निशान-ए-पाकिस्तान’ देण्याचा प्रस्ताव पाकिस्तानी सिनेटर मुश्ताक अहमद यांनी सादर केला. पाकिस्तानी सिनेटने जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० ची तरतूद हटवण्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये कथित विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. काश्मीरमध्ये गिलानी यांच्या फुटिरतावादी कारवायांमुळेच त्यांना पाकिस्तान आपल्या निशान-ए-पाकिस्तान या पुरस्काराने सन्मानित करणार असल्याचे म्हटले जात आहे.

भारतात दहशतवाद्यांना फंडिंग करण्याचा गिलानींवर आरोप

काही दिवसांपूर्वीच काश्मीरचा फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानी याने हुर्रियतचा राजीनामा दिला होता. सैय्यद अली शाह गिलानी हे काश्मीरमधील दहशतवाद आणि हिंसेला जबाबदार असलेल्या लोकांपैकी एक असल्याचे त्याच्यावर आरोप आहेत. गिलानी याच्यावर सन २०१६ मध्ये झालेल्या काश्मीरमधील हिंसाचारानंतर दहशतवाद्यांना फंडिग करण्याचेही आरोप ठेवण्यात आले होते. या व्यतिरिक्त गिलानी याला दीर्घ काळापासून त्यांच्या काश्मीरमधील घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

वाचा:

गिलानीने दिला आहे हुर्रियतचा राजीनामा
गिलानीने हिर्रियतचा राजीनामा दिला आहे. मात्र ही आयएसआयची एक चाल असल्याचे म्हटले गेले होते. मात्र, गिलानीची तब्येत साथ देत नसल्याने त्याने राजीनामा दिला असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांचे म्हणणे होते. गिलानीचे वय ९० वर्षांच्या आसपास आहे. गिलानी हा जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथील रहिवासी आहे.

वाचा:

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

  2. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here