• 07:27 AM, Feb 01 2023

  माघी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला पुण्यातील सचिन चव्हाण या भाविकाने फुलांची आकर्षक सजावट केली आहे.
 • 07:25 AM, Feb 01 2023

  हिंगोली – जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण, पिकांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.

 • 07:20 AM, Feb 01 2023

  अर्जुन खोतकर यांना दिलासा : खोतकर यांचे जावई विजय झोल व भाऊ विक्रम झोल यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर.

 • 07:20 AM, Feb 01 2023

  नांदेड : धर्मांतराचे खोटे गुन्हे दाखल होत असल्याच्या निषेधार्थ ख्रिश्चन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.

 • 07:19 AM, Feb 01 2023

  पुणे बार असोसिएशन निवडणूक: नवनियुक्त पदाधिकारी तथा विजयी उमेदवारांची यादी

  अध्यक्ष ॲड. केतन कोठावळे उपाध्यक्ष ॲड. विश्वजित पाटीलॲड.जयश्री बिडकर -चौधरी सचिव ॲड राहुल कदमॲड गंधर्व कवडे खजिनदार ॲड. समीर बेलदरे ऑडिटर ॲड. अजय देवकर

 • 07:19 AM, Feb 01 2023

  बुलढाणा : डीजे लाऊन वाजत-गाजत केले स्त्री जन्माचे स्वागत, मोलमजुरी करणारा विजय श्रीनाथ ठरला अनेकांसाठी आदर्श

 • 07:18 AM, Feb 01 2023

  रत्नागिरी येथे १२ फेब्रुवारीला शासनाचा भव्य रोजगार मेळावा, राज्यातला पहिला रोजगार मेळावा रत्नागिरीत होणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती; इयत्ता पाचवी शिकलेल्या व्यक्तीलाही देणार रोजगार

 • 07:18 AM, Feb 01 2023

  चिपळूण येथे ५ फेब्रुवारीपासून कोकणी लोककला महोत्सव; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 • LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here