Jalna News: जालना जिल्ह्यातील (Jalna District) भोकरदन न्यायालयाच्या परिसरात मंगळवारी झालेल्या हाणामारीच्या घटनेने काही वेळेसाठी गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. घटस्फोट मिळाल्यानंतर महिलेने सासऱ्याच्या आणि पतीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर झालेल्या वादामुळे न्यायालयाच्या आवारात दोन गटात फिल्मी स्टाईल हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे पोलिसांना (Police) अक्षरशः लाठीमार करावा लागला. या घटनेचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, याप्रकरणी न्यालयाच्या आदेशाने पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. 

याबाबतची माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील पोखरी येथील सुवर्णा सुभाष लुटे हिचा विवाह आडगाव भोंबे ( ता भोकरदन) येथील शुभम विनायक साळवे यांच्या सोबत झाला होता. सुरवातीला काही दिवस सर्व सुरळीत सुरू असतानाच, पुढे वाद होऊ लागले. वाद अधिकच वाढत असल्याने आणि आपापसांत पटत नसल्याने सुवर्णा काही दिवसांपासून माहेरी राहत होती. त्यानंतर नातेवाईकांनी एकत्र येऊन बैठक घेत दोघांनी फारकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुषंगाने दोन्हीकडील नातेवाईक आज दुपारी भोकरदन न्यायालयाच्या परिसरात आले. वकिलांकडून नोटरीकरून घेत दोघांनी फारकत घेतली. शुभम याने सुवर्णास ठरल्याप्रमाणे 4 लाख रुपये दिले. हे सर्व शांततेत पार पडले. 

न्यायालयाच्या परिसरातच दोन्ही गट भिडले 

न्यायालयात  वकिलांकडून नोटरीकरून घेत दोघांनी फारकत दिली. पण अचानक सुवर्णाने पळत जाऊन सासरा विनायक साळवे यांच्या कानशिळात लगावली. हे दृश्य पाहताच शुभम धावून आला असता, त्यालाही सुवर्णाने मारहाण केली. त्यानंतर दोन्हीकडील मंडळी एकमेकांवर तुटून पडले. आरडाओरडा सुरू झाल्याने न्यायाधीशांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. पोलिस कर्मचारी गोपाळ सतवन, संतोष गायकवाड यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. पोलिस उपनिरीक्षक युवराज पाडळे यांनी दोन्ही गटांना शांत केले. 

पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान या प्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिस कर्मचारी गोपाल सतवन यांच्या तक्रारी वरून विनायक किसन साळवे, सुवर्णा सुभाष लुटे-साळवे, शुभम विनायक साळवे, विलास माणिक साळवे, पंडित किसन साळवे, शिवाजी भोंबे, सर्जेराव पाटील तांगडे, निवृत्ती सुभाष लुटे, गजानन वामन जगताप, देविदास सुरडकर यांच्या विरुध्द भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

news reels reels

महत्वाच्या इतर बातम्या: 

Jalna News: नायब तहसीलदार असलेल्या पतीचे अनैतिक संबंध; शिक्षिका पत्नीने केली आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here