नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकार २०१४ पासून सत्तेत आहे. पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. दोन टर्म पूर्ण करून तिसरी टर्म मिळवण्याचा प्रयत्न सरकार करेल. त्यादृष्टीनं यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करेल. सीताराम अर्थसंकल्प मांडत असताना उद्योग जगतात महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत

जगातील १० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत उद्योगपती गौतम अदानींना मागे टाकून मुकेश अंबानी पुढे सरकले आहेत. अदानी समूहाच्या शेअर्सची घसरण सुरुच आहे. हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाला मोठा धक्का बसला. त्याचे परिणाम आजही दिसत आहेत. अदानी यांच्या संपत्तीत घसरण झाली आहे. त्यांच्या संपत्तीचं मूल्य सध्याच्या घडीला ८३.९ अब्ज डॉलरवर आलं आहे. तर अंबानींच्या संपत्तीचं मूल्य ८४.३ अब्ज डॉलर इतकं झालं आहे. जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत सध्या अदानी दहाव्या आणि अंबानी नवव्या नंबरवर आहेत.
मिशन २०२४ सुरू! सीतारामन यांची मोठी घोषणा; गरिबांसाठी वर्षभर सुरू राहणार महत्त्वाची योजना
सीतारामन अर्थसंकल्प मांडत असताना जगातील श्रीमंतांच्या यादीत अंबानींनी अदानींना मागे सारलं. गौतम अदानींच्या कंपन्यांच्या शेअर्समधील घसरण सुरुच आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीचं मूल्य घटलं आहे. सध्या त्यांची संपत्ती ८३.९ अब्ज डॉलर इतकी आहे. मुकेश अंबानींच्या संपत्तीचं मूल्य ८४.३ अब्ज डॉलर आहे. गेल्या फेब्रुवारीत अदानी यांनी अंबानींना मागे टाकलं. ते आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. यानंतर ब्लूमबर्गच्या यादीत अदानी अतिशय वेगानं पुढे गेले. त्यांनी अनेक प्रतिष्ठीत उद्योगपतींना मागे सारलं. त्यामुळे अंबानी आणि अदानी यांच्या संपत्तीमधील अंतर वाढत गेलं. मात्र वर्षभरानंतर अंबानी यांनी अदानी यांना मागे टाकलं आहे.

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गनं २४ जानेवारीला एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यातून अदानी समूहाला ८८ प्रश्न विचारण्यात आले. अदानी समूहातील कंपन्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. यानंतर अदानी समूहाला मोठा धक्का बसला. कंपन्यांचे शेअर गडबडले. त्यामुळे गुंतवणूकदारांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here