नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ०१ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प (Last Full Budget Of Modi 2.0)सादर करण्यात आला आहे. यामध्ये काय स्वस्त आणि काय महागलं याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना आता तलप महागली, असं म्हणायला हरकत नाही.

बजेटमध्ये सिगारेटवरील राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक शुल्क (NCCD) १६ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे आता सिगारेट महाग होणार आहेत. खरंतर, गेल्या २ वर्षांपासून सिगारेटच्या ड्युटीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इतकंच नाहीतर दारूही महागणार आहे.

Budget 2023 Highlights: बजेटमध्ये तुमच्यासाठी काय? निर्मला सीतारामण यांच्या आतापर्यंत १० मोठ्या घोषणा
या वस्तूंच्या किमती वाढतील…

– आयात केलेली चांदीची भांडी

– विदेशी स्वयंपाकघर चिमणी

– एक्स-रे मशीन

– प्लॅटिनम

– सिगारेट

– दारू

– छत्री

– सोने

– हिरा

दरम्यान, यावेळी सीतारामन यांनी कर्ज, करामध्ये सवलत, शेतकरी, व्यावसायिक, महागाई अशा महत्त्वाच्या क्षेत्रांविषयी मोठ्या घोषणा केल्या आहेत. काय आहेत या घोषणा? वाचा सविस्तर…

Union Budget 2023 : देशातील कोट्यवधी महिलांना निर्मला सीतारामन यांचं खास गिफ्ट, बजेटमध्ये मोठी घोषणा
– अर्थंसंकल्पाचे सात आधार; अर्थमंत्र्यांनी सांगितली सप्तर्षी योजना
– प्राप्तिकर रचनेत १५ लाखांहून अधिकच्या मिळकतीसाठी ३० टक्के कर
– सर्वसामान्यांना दिलासा; सात लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त
– सोने, चांदीचे दागिने महागणार, तर, मोबाइल फोन स्वस्त होणार
– इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणारः अर्थमंत्री निर्मला सीतारमण
– देशात मोबाईल हँडसेटच्या उत्पादनात मागील वर्षात मोठी वाढ, मोबाईलच्या काही घटकांवर सीमाशुल्कात घट
– लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी ९ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
– देशांतर्गत पर्यटन क्षेत्रांना चालना देण्यासाठी ‘स्वदेश दर्शन योजना’
– येत्या तीन वर्षांत लाखो युवकांच्या कौशल्यवाढीसाठी पावले उचलणारः अर्थसंकल्पात तरतूद
– पॅन कार्ड आता कॉमन ओळखपत्र म्हणून वापरता येणार
– अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २ लाख.४0 हजार कोटी लाखांची तरतूद
– ०२३-२४ साठी २० लाख कोटींचे कृषि कर्ज, पशुपालन, दुग्ध आणि मत्स्यपालनाकडे लक्ष केंद्रित करणार
– राज्यांना आणखी एका वर्षासाठी ५० वर्षांसाठी विना व्याज कर्जः अर्थमंत्र्यांची घोषणा
– गटारांच्या सफाईसाठी मानवी वापर बंद
– पंतप्रधान आवास योजनेसाठी आर्थिक तरतूद ६६ टक्क्यांनी वाढवून ७९ हजार कोटी रुपये करणार
– मत्स विकासासाठी ६ हजार कोटींची यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद
– देशभरात नॅशनल डिजिटल लायब्ररीची स्थापना करणार
– देशभरात १५७ नर्सिंग कॉलेज उभारणार
– भरड धान्यासाठी हब तयार करण्याची घोषणा; भरड धान्याला “श्री अन्न’ नाव देणार
– दोन हजार ५१६ कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशभरात प्राथमिक सहकारी संस्था स्थापन करून साठवणुकीचे विकेंद्रीकरण करणारः अर्थमंत्री
– ८१ लाख महिला बचतगटांचे सबलीकरण करणार; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा
– गरीब जनतेला एक वर्ष मोफत धान्य देणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here