बचाव दलाचे कर्मचारी कुटुंबाला वाचवण्यासाठी उंच कड्यावरून खाली उतरले. तेव्हा पटेलची पत्नी ओरडत होती. पतीनं जाणूनबुजून कार कड्यावरून खाली पाडल्याचं तिनं सांगितलं. मात्र त्यानंतर तिनं पतीविरोधात काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र पटेलविरोधात मिळालेले परिस्थितीजन्य पुरावे पुरेसे असल्याचं वागस्टाफ यांनी सांगितलं. कुटुंबाची हत्या करण्यासाठी पटेलनं कार मुद्दामहून खाली पाडली.
पटेलला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. मात्र त्याचा वकील जोश बेंटले यांनी न्यायालयाकडे ९ फेब्रुवारीपर्यंतची मुदत मागितली. ही मागणी न्यायालयानं मान्य केली. मात्र न्यायालयानं पटेलला जामीन देण्यास नकार दिला. पटेलनं कुटुंबापासून दूर राहावं, असं न्यायालयानं आदेशात म्हटलं.
पटेल दक्षिण कॅलिफॉर्नियातील रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करतो. पटेल त्याच्या कुटुंबासह २ जानेवारीला सॅन फ्रॅन्सिस्कोपासून २४ किलोमीटर अंतरावर दक्षिण पॅसिफिकच्या किनाऱ्यावर असलेल्या महामार्गावरून जात होता. ४१ वर्षीय पत्नी, ७ वर्षांची मुलगी आणि ४ वर्षांचा मुलगा यांच्यासह पटेल कारनं प्रवास करत होता. त्यावेळी त्यानं कार डेविल्स स्लाईड येथून खाली पाडली. त्याची कार ७६ मीटर खाली मिळाली. डेविल्स स्लाईड अत्यंय धोकादायक मानली जाते. तिथून खाली कोसळल्यानंतर जीव वाचणं अतिशय कठीण असतं. त्यामुळे पटेल आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव वाचणं हा चमत्कार मानला जात आहे.