मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर टीका करताना त्यांना नारायण राणेंचा दाखला देणारे शिवसेनेचे माजी आमदार यांच्यावर भाजपचे आमदार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही हे त्यांना माहीत आहे,’ असा बोचरा टोला नीतेश यांनी क्षीरसागर यांना हाणला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. मुख्यमंत्री ठाकरे हे मीडियाला मुलाखत न देता केवळ ‘सामना’ला मुलाखत देतात, राज्यात न फिरता ‘मातोश्री’वर बसून राज्यकारभार करतात, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला क्षीरसागर यांनी सोमवारी उत्तर दिलं होतं. ‘पाटील हे अचानक आंबा पडल्यासारखे मोठे झालेले नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करू नये. असे अचानक मोठे झालेले कोणत्याही क्षणी पायदळी येऊ शकतात हे लक्षात ठेवावे. शिवसेनेवर टीका करतात त्यांची काय अवस्था होते, त्यांचा शेवट कसा होतो, याचा अनुभव नारायण राणे यांना आला आहे,’ असं क्षीरसागर म्हणाले होते.

पाटलांना इशारा देताना क्षीरसागर यांनी नारायण राणेंचा उल्लेख केल्यानं नीतेश राणे भडकले आहेत. त्यांनी लगेचच ट्वीट करून क्षीरसागर यांच्यावर तोफ डागली आहे. ‘राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही हे राजेश क्षीरसागर यांच्यासारख्या भुंकणाऱ्यांना माहीत आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकीचे बिस्कीट आमचं नाव घेतले की मिळेल असा त्यांचा गैरसमज झाला असेल, असं नीतेश यांनी म्हटलं आहे. पण रामदास कदम सारख्यांचे किती दात उरले आणि काय अवस्था मातोश्रीने केली हेही लक्षात ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here