मुंबई: जेव्हा आपण दिवाळीत घराची साफसफाई करायला घेतो, यादरम्यान आपल्याला अनेक अशा गोष्टी मिळतात ज्या कधीतरी हरवलेल्या असतात किंवा आपण त्या कुठेतरी ठेवून विसरुन गेलेलो असतो. जेव्हा त्या सापडतात तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं की हे इथे होतं. असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं आहे. या महिलेला तिच्या सोफ्यात असं काही सापडलं की ती हैराण झाली. हा सोफा तिच्याकडे गेल्या १३ वर्षांपासून होता. त्यामध्ये कुठल्या वस्तू जमा होत आहेत याची तिला कल्पनाही नव्हती.

जेव्हा तिने रिमोट शोधण्यासाठी तिने सोफा तपासला तेव्हा तिला १३ वर्षांपासून त्या सोफ्यात जमा झालेला खजिना सापडला. ही घटना केसी नावाच्या महिलेच्या घरची आहे. तिने टिकटॉकवर व्हिडीओ पोस्ट करत ही कहाणी सांगितली आहे. केसीचा संपूर्ण वेळ हा तिच्या मुलांचे संगोपन आणि व्यवसायात जातो. त्यामुळे तिने कधीच तिच्या सोफ्याकडे लक्ष दिलं नाही, गेल्या १३ वर्षात तिच्या सोफ्याच्या आत काय आहे याबाबत तिला काहीही माहिती नाही. पण, जेव्हा तिने सोफ्याचे तुकडे केले तेव्हा त्यातून जे निघालं ते पाहून ती आश्चर्यचकितच झाली.

shocking stuff inside Sofa


हेही वाचा –मॉलमध्ये चार वर्ष घरासारखा राहिला, कुणाला पत्ताही लागला नाही; एक चूक अन् असा झाला भांडाफोड

एक दिवस हे संपूर्ण कुटुंब टीव्हीचा रिमोट शोधत होती. यावेळी त्यांनी सोफ्यावरील उशीच्या मध्येही त्यांना रिमोट सापडला नाही. तेव्हा त्यांना वाटलं की रिमोट सोफ्याच्या मागे पडला असावा. पण तिथेही त्यांना रिमोट सापडला नाही. त्यामुळे त्यांनी सोफा कापण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांना सोफ्याच्या आत हा रिमोट सापडला. पण, त्याशिवाय त्यांना बऱ्याच अशा गोष्टी सापडल्या ज्या पाहून हे कुटुंब हैराण झालं. या सोफ्याच्या आत बराच कचरा त्यांना सापडला. हा सगळा कचरा गेल्या १३ वर्षांपासून येथे साचत होता.

हेही वाचा –अखेरचा मुलीचा चेहरा बघून घे, पतीला मेसेज; साडेतीन वर्षाच्या लेकीला कडेवर घेतलं अन् पत्नीने… नागपूर हादरलं

केसीच्या या व्हिडीओला आतापर्यंत ३.६ मिलियन लोकांनी पाहिलं आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला केसी सोफ्याच्या मागे जमिनीवर बसलेली दिसत आहे. तिच्या हातात चाकू आहे आणि ती सोफा कापताना दिसते. या कचऱ्यात लहान मुलांची हरवलेली खेळणी आणि घरातील हरवलेलं बरंच सामान सापडलं.

हेही वाचा –वर्गात शिकवतानाच मास्तरांची एक्झिट! हार्ट अटॅक येऊन खाली कोसळले, विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here