आरोप कर्मचाऱ्याकडे कंपनीशी संबंधित कॅब चालकांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची जबाबदारी होती. त्यावेळी त्यानं अतिशय चलाखीनं सर्व्हरशी छेडछाड केली आणि बोगस चालक सिस्टिमवर जोडले. या बोगस चालकांची संख्या ३८८ होती. यानंतर कर्मचाऱ्यानं बोगस चालकांच्या खात्यावर पैसे पाठवण्यास सुरुवात केली. त्यानं हळूहळू करून बोगस चालकांच्या खात्यांमध्ये १.१७ कोटी रुपये पाठवले.
आरोपीनं ३८८ बोगस कर्मचाऱ्यांची माहिती सिस्टिमवर जमा केली. त्यापैकी ३४५ जणांना फोन नंबर एकच होता. मात्र त्यांची नावं वेगवेगळी होती. या ३८८ जणांना पाठवण्यात आलेले पैसे केवळ १८ बँक खात्यांमध्ये गेले होते. याचा अर्थ एका बँक खात्यावर अनेक ड्रायव्हर्स लिंक करण्यात आले होते.
आरोपीनं एखाद्या ऑटोमॅटिक टूलचा वापर केला असावा. त्यामुळे त्यानं केलेला घोटाळा लगेच पकडला गेला नाही, असं गुरुग्राम पोलिसांनी सांगितलं. अनेक दिवस घोटाळा सुरुच होता. डिसेंबर २०२१ मध्ये कर्मचाऱ्यानं कंपनी सोडली. त्यानंतर कित्येक महिन्यांनंतर हेराफेरी उघड झाली. आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.