मुंबई: मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं (डीआरआय) मोठी कारवाई केली आहे. अदिस अबाबावरून आलेल्या भारतीयाला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी रोखलं. प्रवाशाबद्दल संशय आल्यानं त्यानं आणलेल्या सामानाची झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडे एक साबण सापडला. संशयावरून या साबणाची तपासणी करण्यात आली आणि डीआरआयच्या अधिकाऱ्यांचा संशय खरा ठरला.

भारतीय प्रवाशाच्या बॅगमध्ये अधिकाऱ्यांना एक खोका सापडला. हा खोका एका साबणाचा होता. या खोक्यात अधिकाऱ्यांना एक पांढऱ्या रंगाचा साबण दिसला. संशय वाढल्यानं अधिकाऱ्यांनी नीट तपासणी केली. त्यांच्या हाताला मेण लागलं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी साबण घासला. मेणाचा थर बाजूला झाल्यानंतर आतमध्ये एक वडी दिसली. ही वडी साबणासारखी दिसत होती. मात्र तो साबण नव्हता.
कार पळवली; कुटुंबाला संपवण्यासाठी कड्यावरून पाडली; भारतीयाच्या कारनाम्यानं अमेरिका सुन्न
व्यवस्थित तपासणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना हा पदार्थ कोकेन असल्याचं लक्षात आलं. कोकेनचं वजन ३३६० ग्रॅम इतकं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत तब्बल ३३.६० कोटी रुपये इतकी आहे. या प्रवाशाला अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

दुसऱ्या एका घटनेत पोलिसांनी पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात एकाला अटक केली. सोन्याची बिस्किटं लपवल्यानं अधिकाऱ्यांनी त्याला बेड्या ठोकल्या. जप्त सोन्याचं वजन ९०० ग्रॅम असून त्याची किंमत ५४ लाख रुपये आहे. मडई मंडल असं आरोपीचं नाव आहे. त्यानं पोटाच्या आत लपवून सोन्याची बिस्किटं आणली होती. ती बीएसएफनं जप्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here