धुळे : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध्य व्यवसाय करणाऱ्याचा सुळसुळाट आहे. अवैध्य व्यवसाय करण्यारांविरोधात पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात आता कंबर कसली आहे. आज धुळे शहरातील राजीव गांधी नगरात पोलिसांनी अवैध्य मिनी दारुचा कारखाना उद्ध्वस्त केला. कारखान्यातील दृश्य पाहून पोलिसही हादरले.

शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या राजीव गांधी नगरात गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध दारुचा मिनी कारखाना सुरू होता. यासंदर्भात पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली होती. यानंतर धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्यासह पोलिसांनी छापा टाकत लाखो रुपयांचा दारू बनवण्याचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या छाप्यात अवैधरित्या दारू बनवणारे दोन आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. पण दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे लाखो रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

dhule police raid on illegal liquor factory

पोलिसांचा अवैध दारुच्या कारखान्यावर छापा


पोलिसांनी छाप्यात अवैध दारुचा मोठा साठा जप्त केला आहे. यात दारुच्या बनावट बाटल्यांचे भरलेले बॉक्स, मोठ्या प्रमाणात स्पिरिट, दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

आठ वर्षांपूर्वी आंतरजातीय लग्न, सतत कौटुंबिक वाद; दिवसाढवळ्या बायकोला संपवलं

पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, विभागीय पोलिस उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी, धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय ऊजे, मच्छिंद्र पाटील, हेमंत पाटील, कुंदन पटाईत, गुणवंत पाटील, निलेश पोतदार, प्रवीण पाटील, मनीष सोनगीरे यांच्या पथकाने ही कारवई केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी यावेळी दिली.

द्या पैसे काढून देतो, मदत करायचे अन् कार्ड चोरायचे, भामट्यांकडे तब्बल ९४ ATM मिळाले अन् मग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here