कोल्हापूर: महाराष्ट्राच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत, असं वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी काही वेळातच याबाबत खुलासा केला आहे. ‘एकत्र यायला तयार आहोत याचा अर्थ आम्ही हात पुढे केला असा अर्थ नाही. शिवसेनेला उपरती झाली तर ते येतील. आम्ही त्यांच्याकडं जाणार नाही,’ असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ( on Shivsena-BJP Alliance)

हेही वाचा:

कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी शिवसेनेसोबतच्या संभाव्य युतीबाबत वक्तव्य केलं होतं. ‘राज्याच्या हिताच्या दृष्टीने आम्ही शिवसेनेसोबत आजही एकत्र यायला तयार आहोत. केंद्रीय नेतृत्वानं एखादा फॉर्म्युला तयार केला आणि मुख्यमंत्री यांना तो मान्य झाला तर भाजप-शिवसेना एकत्र येऊ शकते. आम्हाला केंद्राचे आदेश पाळावेच लागतात,’ असं ते म्हणाले होते. पाटलांच्या या वक्तव्यामुळं अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. भाजप बॅकफूटवर गेल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर लगेचच पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

‘शिवसेनेला उपरती झाली तर ते आमच्याकडे येतील. आम्ही तसा कुठलाही प्रयत्न करणार नाही. आताही शिवसेनेला आमच्यासोबत सरकार स्थापन करायचं असेल तर आम्ही एकत्र येऊ. काँग्रेस व राष्ट्रवादीला बाजूला ठेवायचं असं उद्धव ठाकरे यांना वाटलं तर केंद्रीय नेतृत्वाला ते तसं सांगतील. या भविष्यातील शक्यता आहेत,’ असंही ते म्हणाले.

हेही वाचा:

शिवसेना सोबत येण्याची शक्यता व्यक्त करताना पाटील यांनी बिहारचा दाखला दिला. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दलानं लालूप्रसाद यादव यांच्यासोबत निवडणूक लढवली होती. त्यांच सरकारही स्थापन झालं. मात्र, त्यांचं जमलं नाही आणि एका वर्षात त्यांनी राजीनामा दिला. नंतर भाजपला एकत्र घेऊन सरकार स्थापन केलं होतं. महाराष्ट्रातही तसं होऊ शकतं,’ असं पाटील म्हणाले. ते ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here