Pune Koyta Gang Police Reword:   पुण्यात सध्या (Pune police) गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. याच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी नवी शक्कल लढवली आहे. कोयता बाळगणार्‍याला (Koyta gang) पकडा आणि बक्षीस मिळवा, असं पुणे पोलिसांनी थेट जाहीरच करुन टाकलं आहे. त्यासोबतच हत्यार बाळगणाऱ्या गुंडाना पकडणार्‍या पोलिसांवरही पोलीस दल बक्षीसांची खैरात करणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत पाहायला मिळतेय. याच कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. 

पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगनं धूमाकुळ घातला असून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. रोज नव्या परिसरात कोयता गॅंग धुमाकूळ घातलाना दिसत आहे. यांच्यामुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवाय यापूर्वी या कोयता गॅंगनं अनेक व्यापाऱ्यांचं नुकसानदेखील केलं आहे. त्यामुळे या सगळ्यांना जेरबंद करण्याचं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. त्यासाठीच पुणे पोलिसांनी ही शक्कल लढवली आहे. 

पोलिसांनी आखलेल्या योजनेनुसार, पिस्तूल जवळ बाळगणार्‍या गुंडाला पकडल्यास दहा हजार तर कोयता बाळगणार्‍याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. वाँटेड, फरार आरोपींना पकडल्यास देखील हजारो रुपयांची बक्षीसं देण्यात येणार असून पुणे पोलिसांची ही बक्षीस योजना आता चर्चेचा विषय ठरत आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील पश्चिम आणि पूर्व प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तांनी ही बक्षीस योजना जाहीर केली आहे. 

कोयता गँगचा आरोपी पकडून दिल्यास तीन हजारांचं बक्षीस देण्यात येईल. पिस्तूल जवळ बाळगणारा आरोपी पकडून दिल्यास 10 हजार तर फरार आरोपी पकडून दिल्यास 10 हजारांचं बक्षीस देण्यात येईल. मोक्का किंवा एमपीडीएतील आरोपी पकडल्यास 5 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

news reels reels

कोयता गॅंगविरोधात पोलिसांनी कंबर कसली

मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. यामुळे पुणे पोलिसांनी थेट कोयता विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकला होता. दुकानातून नवीन विक्रीसाठी ठेवलेले 105 कोयते जप्त केले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली होती. कोयते पुरवणाऱ्या विक्रेत्याला अटक केली होती. त्यांनंतर पुणे पोलिसांनी कॉंम्बिंग ऑपरेशनदेखील राबवलं होतं. यातून किमान शहरातील 3,765 गुन्हेगारांची चौकशी केली होती. कोयता गॅंंगच्या आरोपींची हलगी वाजवत धिंडदेखील काढण्यात आली होती. कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्यांची रस्त्यावर पोलिसांनी वरात काढली होती. कोयता गॅंगचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. त्यांना पकडणाऱ्यांना रिवार्ड जाहीर केला आहे. हा रिवार्ड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here