पाटणा: मस्ती करणाऱ्या मुलांना शाळेतले शिक्षक मुलींच्या मध्ये बसवतात. दोन मुलींच्या मधोमध मुलाला बसवलं की मग तो मस्ती करणार नाही, असा शिक्षकांचा कयास होता. अनेकदा ही आयडियाची कल्पना काम करते. मात्र बिहारमधल्या एका मुलासोबत यापेक्षा वेगळा किस्सा घडला आहे. परीक्षा देण्यासाठी गेलेला मुलगा वर्गात जाताच चक्कर येऊन पडला आणि याला वर्गातील मुली कारण ठरल्या. विद्यार्थ्याची स्थिती इतकी बिघडली की त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं.

बिहारमध्ये १ फेब्रुवारीपासून इंटरमीडिएट परीक्षा सुरू झाल्या आहेत. नालंदामधील एका परीक्षा केंद्रावर मनिष शंकर नावाचा विद्यार्थी पेपर देण्यासाठी ब्रिलिएंट कॉन्वेंट शाळेत गेला होता. वर्गात शिरताच त्यानं मुली पाहिल्या. वर्गात तब्बल ५०० मुली होत्या. मनिष वगळता वर्गात एकही मुलगा नव्हता. तब्बल ५०० मुलींमध्ये बसून पेपर लिहायचा या विचारानं मनिषच्या पोटात गोळा आला. त्याची प्रकृती बिघडली. अचानक भोवळ आली आणि तो खाली पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
बापरे! ३८८ ड्रायव्हर, ३४५ जणांचा एकच नंबर; १८ बँक खाती अन् १ कोटीचा चुना; Uberला मोठा गंडा
मनिष शंकर हा अल्लाम इक्बाल महाविद्यालयात शिकतो. पेपर देण्यासाठी तो ब्रिलिएंट कॉन्वेंट शाळेत गेला होता. वर्गात गेल्यावर त्याला सगळीकडे मुलीच दिसल्या. त्या वर्गात मनिष वगळता एकही मुलगा नव्हता. यामुळे मनिषला वेगळंच टेन्शन आलं. त्याला ग्लानी आली. ‘वर्ग मुलींनी भरलेला होता ते पाहून मनिष घाबरला. त्याला ताप भरला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं,’ असं मनिषच्या काकीनं सांगितलं.
भयंकर! ऑपरेशनवेळी मुलीचे अवयव चोरले; शरीरात पॉलिथिनच्या पिशव्या भरल्या अन् मग…

घटनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. काही जणांना प्रकरण मजेदार वाटतंय, तर काहींना गंभीर वाटतंय. ‘गावातील शाळांमध्ये आजही मुला-मुलींना वेगवेगळं बसवलं जातं. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होणं स्वाभाविक आहे,’ अशा आशयाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here