माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील आरोपी ए. जी. उर्फ अरीवू यानं मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भातील याचिका केली आहे. पेरारीवलन हा सध्या चेन्नईतील तुरुंगात आहे. संजय दत्तप्रमाणेच त्यालाही बेकायदा शस्त्रास्त्रविरोधी कायद्यांतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे. नऊ व्होल्टच्या दोन बॅटरी उपलब्ध करून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या बॅटरींचा वापर राजीव गांधी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या बॉम्बमध्ये करण्यात आला होता. याच प्रकरणात पेरारीवलन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मागील २९ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या पेरारीवलन यानं तुरुंग प्रशासनाकडून संजय दत्तच्या शिक्षेतील कपातीबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती त्याला मिळू शकली नाही. त्यामुळं त्यानं न्यायालयात धाव घेतली आहे. अॅड. नीलेश उके यांच्यामार्फत त्यानं न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
वेळेआधी सुटला होता संजय दत्त
संजय दत्त याला २००६-०७ साली विशेष न्यायालयानं शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवून सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना ही शिक्षा एका वर्षाने कमी केली होती. त्यानंतर मार्च २०१३ साली संजय दत्त तुरुंगात गेला. शिक्षा भोगत असताना त्यांना अनेकदा पॅरोलवर सुट्टी देण्यात आली होती. शिवाय, २५ फेब्रुवारी २०१६ रोजी २५६ दिवस आधी त्याची तुरुंगातून सुटकाही करण्यात आली.
आणखी वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times